Janhvi Kapoor Boyfriend Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा संपर्ण इंडस्ट्रीत रंगल्या आहेत. बऱ्याचदा दोघेजण एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच, जान्हवी आणि शिखर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच सोशल मीडियावरील एका पोस्टवर लोकांनी अभिनेता वीर पहाडियाचा भाऊ आणि जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला ट्रोल केलं आहे. तसेच, ट्रोल करताना अश्लील टिप्पणीचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिखर पहाडियानं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. शिखर पहाडियानं ट्रोलर्सना दिलेल्या उत्तरानंतर आता नेटकऱ्यांकडून शिखरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया त्यांच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत असतात, पण त्यांच्या नात्याबाबत त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीसुद्धा दोघे नेहमीच एकत्र दिसतात. सर्व सण, समारंभ एकत्र साजरे करत असतात. कोणताही कार्यक्रम असो, किंवा पार्टी शिखर आणि जान्हवी एकत्रच असतात. दिवाळीच्या निमित्तानं शिखरनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर जान्हवी आणि पाळीव कुत्र्यासोबतचा एक फोटो शेअर केला. अनेकांनी त्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पण, एका युजरनं त्या फोटोवरुन शिखरला ट्रोल केलं आणि लिहिलं की, "पण तू दलित आहेस..."






शिखर पहाडियाचं 'दलित' म्हणणाऱ्याला सडेतोड उत्तर 


शिखर पहाडियानं ट्रोल करणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत शिखर म्हणाला की, "हे अत्यंत खेदजनक आहे की, आजही तुझ्यासारखे लोक मागासलेल्या मानसिकतेचे आहेत. दिवाळी प्रकाशाचा आणि एकतेचा उत्सव आहे, जे तुझ्या कल्पनेच्या पलिकडे आहे..."



शिखर पहाडियानं ट्रोलर्सच्या विचारांना म्हटलं, अस्पृश्य


शिखर पहाडियानं पुढे म्हटलं की, "भारताची ताकद नेहमीच विविधतेत आणि समावेशकतेत राहिली आहे. तुम्ही हे समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहात. कदाचित अज्ञान पसरवण्याऐवजी तुम्ही स्वतःला सुशिक्षित करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, कारण सध्या अस्पृश्यता म्हणजे, तुमची विचारसरणी."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Actor Vidyadhar Joshi On Nagpur Violence: नागपूर हिंसाचारानंतर 'बाप्पा' संतापले, मराठी अभिनेत्याने राजकारण्यांना सुनावलं; म्हणाला, 'एवढे वर्ष तो जमिनीत झोपला होता ना मग...'