Chhaava and Ganoji Raje Shirke family : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित छावा (Chhaava) हा सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम मोडित काढले आहेत. रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात या सिनेमाने 300 कोटींची कमाई केली आहे. अभिनेता विकी कौशल याने या सिनेमात संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. याशिवाय रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची भूमिका पार पाडलीये.


गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजी महाराजांचा घात, गद्दारीचा शिक्का


दरम्यान, छावा सिनेमात संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्के औंरगजेबाला देतात. त्यानंतर संभाजी महाराजांना मोजक्या सैन्यसह मुघलांचं सैन्य संगमेश्वर येथे गाठतं. त्यानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात येतं आणि 40 दिवस अन्ववित अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात येते. दरम्यान, संभाजी महाराज मुघलांना सापडतात, याचा संपूर्ण कट गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून रचण्यात आला, असं छावा सिनेमात दाखवण्यात आलं आहे. याच प्रसंगावर राजेशिर्के घराण्याने आक्षेप नोंदवले असून त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  






गणोजी आणि कान्होजी राजेशिर्के यांची बदनामी केली; छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करा; राजेशिर्के घराण्याची मागणी


छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कान्होजी आणि गणोजी राजेशिर्के यांना खलनायक केलं. त्यामुळे राजेशिर्के घराण्याची बदनामी झाली. ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या चित्रपटातील हा मजकूर काढून टाकवा आणि पुन्हा प्रदर्शित करावा अन्यथा आम्ही सगळ्या शहरातून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करू, अशा शब्दात राजेशिर्के यांच्या वारसदार रोष व्यक्त केला आहे. 






इतर महत्त्वाच्या बातम्या 


Swara Bhasker : छावा सिनेमाबाबतच्या वादग्रस्त पोस्टनंतर चारी बाजूंनी टीकेची झोड, अखेर स्वरा भास्करने मौन सोडलं, म्हणाली...