Brahmastra: बॉलिवडू अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी अद्याप एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. हे दोघेही पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर सिंह आणि आलीय भट्ट यांच्यासह अभिनेत्री मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जून हे देखील झळकणार आहेत. यामुळं हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय? याची चाहत्यांना उस्तुकता लागलीय. परंतु, कोरोना महामारीमुळं या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात आहे. यातच प्रेक्षकांच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर येत आहे.
बॉलीवूड हंगामानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यासाठी 15 डिसेंबर रोजी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं जाईल. त्याचवेळी, निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचे संकेत देखील दिलं होते. याचबरोबर रालिया चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात येईल, असंही म्हटलं जातंय.
डिस्ने इंडियासोबत करण जोहरनं या चित्रपटाची निर्मिती केलीय. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होऊ शकतो. ब्रह्मास्त्र हा पौराणिक कथानकावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारिखेत अनेकदा बदल करण्यात आलाय. कोरोनामुळं या चित्रपटाची शूटींग थांबवण्यात आली होती. वी एफएक्समध्येही उशीर झाला होता.
विशेष म्हणजे, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा आहे. मात्र, हे दोघही अद्याप त्यांच्या नात्याबाबत बोलले नाहीत. याचदरम्यान, आलियानेही अनेकदा रणबीरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर आलिया आता नेहमीच रणबीरच्या फॅमिली फंक्शन्समध्ये दिसली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : विकी- कतरिना असणार विरूष्काचे शेजारी ; अनुष्का म्हणाली, 'आता आम्हाला...'
- IMDb Top 10 of 2021 : IMDb वर Jai Bhimचा डंका; तर Aspirants सर्वात पॉप्युलर वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी
- Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स, करिनाची पोस्ट चर्चेत