IMDb Top 10 of 2021:  IMDb ने 2021 मधील लोकप्रिय ठरलेल्या 10 चित्रपट आणि 10 वेब सीरिजची यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये जय भीम  (Jai Bhim) या चित्रपटाने पहिला क्रमांक पटकवला आहे. तर टॉप 10 वेब सीरिजच्या यादीमध्ये'एस्पिरेंट्स' ही वेब सीरिज पहिल्या क्रमांकावर आहे. IMDb लोकप्रिय चित्रपट आणि वेब सीरिजची यादी ही पेज व्ह्यूजच्या आधारावर तयार करतात. त्यामध्ये 1 जानेवारी आणि 29 नोव्हेंबरच्या दरम्यान रिलीज झालेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी IMDb तयार करतात. 


IMDb टॉप 10 चित्रपट 
 1. जय भीम (Jai Bhim)
2. शेरशाह (Shershaah)
3. सूर्यवंशी (Sooryavanshi)
4.  मास्टर(Master)
5. सरदार उधम सिंह (Sardar Udham)
6. मिमी (Mimi)
7. कर्णन (Karnan)
8.  शिद्दत (Shiddat)
9. दृश्यम्-2 (Drishyam 2)
10. हसीन दिलरुबा (Haseen Dillruba)



IMDb टॉप 10 वेब सीरिज 
1. एस्पिरेंट्स (Aspirants)
2. धिंडोरा (Dhindora)
3. द फॅमिली मॅन (The Family Man)
4. द लास्ट आव्हर (The Last Hour)
5. सनफ्लावर (Sunflower)
6. कॅन्डी (Candy)
7. रे (Ray)
8. ग्रहण (Grahan)
9. नोव्हेंबर स्टोरी (November Story)
10. मुंबई डायरिज 26/11 (Mumbai Diaries 26/11)



 'जय भीम' या चित्रपटामध्ये  दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने (Suriya)  प्रमुख भूमिका साकारली आहे.  तसेच  या चित्रपटात   प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तर एस्पिरेंट्स वेब सीरिजमध्ये नवीन कस्तुरिया, नमिता दुबे आणि सनी हिंदुजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. अभिलाष, गुरी आणि एस.के या मित्रांची मैत्री या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या :


katrina Vicky Wedding : कतरिना-विकीचा लग्नानंतरचा पहिला फोटो आला समोर


Katrina-Vicky Wedding Pics : कतरिना कैफ-विकी कौशलचा असाही विक्रम; लग्नाच्या फोटोंना केवळ 20 मिनीटात 10 लाख लाईक्स