Katrina Kaif Was Salman Khans First Choice for Wanted: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आजतागायत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीतील 37 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारलीये. सलमान आणि कतरिना कैफची जोडी सर्वांना आवडते. 'एक था टायगर' हा चित्रपट तुफान गाजला. 'स्पाय युनिव्हर्स' मधील टायगर आणि झोयाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटापूर्वी ते दुसर्या हिट चित्रपटात एकत्र झळकणार होते. दोघांची जोडी नेमकी कोणत्या चित्रपटात एकत्र दिसणार होती? जाणून घेऊयात.
सलमान खानला 'वॉन्टेड' कसा मिळाला?
सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपट म्हणजे 'वॉन्टेड'. या चित्रपटामुळे त्याच्या करिअरचा आलेख कायम चढता राहिला. विशेष म्हणजे या चित्रपटाने सलमान खानची अॅक्शन हिरो म्हणून प्रतिमाही मजबूत केली. हा चित्रपट महेश बाबूच्या सुपरहिट तेलुगू चित्रपट 'पोकिरी'चा अधिकृत रिमेक होता. 'वॉन्टेड' या चित्रपटाची छप्पर फाड बॉक्स ऑफिस कमाई झाली. सलमान आणि आयशाची जोडी प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटाबाबत अलिकडेच निर्माता बॉनी कपूर यांनी खुलासा केला आहे.
'वॉन्टेड' या चित्रपटाबद्दल निर्माता बोनी कपूर यांनी अनेक वर्षांनंतर भाष्य केलं आहे. त्यांनी सलमान खानला कसे कास्ट केले, याबाबत माहिती दिली. बोनी कपूर म्हणाले, "मी 2006 साली पुरी जगन्नाथ दिग्दर्शित यांचा तेलुगू चित्रपट पोकिरी पाहिला होता. या चित्रपटाच्या रिमेकसाठी सलमान खान मला परफेक्ट वाटला होता. राधे उर्फ राजवीर शेखावत हे पात्र सलमान खानने उत्तमरित्या वठवले. मला सलमानने चित्रपट पाहावा अशी इच्छा होती. यासाठी मी खास 2 शोचे आयोजनही केले होते. परंतु त्याच्या व्यस्त वेळा पत्रकामुळे तो येऊ शकला नाही", असं बोनी कपूर म्हणाले.
"सलमान खान एके दिवशी चित्रपट पाहण्यासाठी आला होता. चित्रपट पाहिल्यानंतर सलमान खान काहीच बोलला नाही. पण जाण्यापूर्वी त्याने थंब्स अप केलं. त्याला चित्रपट आवडला हे समजलं", अशी माहिती बोनी कपूर यांनी दिली. शेवटी, बोनी कपूर यांनी असेही उघड केले की, सलमान खान सुरुवातीला चित्रपटात कतरिना कैफला कास्ट करू इच्छित होता. बोनी कपूर म्हणाले, "सलमानने वॉन्टेड चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी कतरिना कैफचे नाव सुचवले होते. पण मला फ्रेश जोडी हवी होती. मला अशी नायिका हवी होती, जिने सलमान खानसोबत कधीही काम केले नाही. आयशा टाकियाला निवडण्यापूर्वी आम्ही जेनेलिया डिसूझाला देखील विचारात घेतले होते", अशी माहिती बोनी कपूर यांनी दिली.
दरम्यान, 2009मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'वॉन्टेड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे सलमान खानला खऱ्या अर्थाने स्टारडम मिळाले. यानंतर सलमानने मागे वळून पाहिले नाही. तो बॉक्स ऑफिसवर राज्य करीत राहिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
प्रसिद्ध अभिनेत्यानं आयुष्य संपवलं; 46व्या वर्षी कलाकारानं उचललं टोकाचं पाऊल, मृत्यूमागचं कारण काय?