Shani Guru Yuti 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 अनेक राशींचं भाग्य घेऊन येणार आहे. कारण या नव्या वर्षात ग्रहांच्या चालीत होणारे बदल फार खास असणार आहेत. नवीन वर्षात देवगुरु ग्रह बृहस्पती आणि कर्मफळदाता शनि देव (Shani Dev) या दोघांची युती निर्माण होणार आहे. हा अत्यंत दुर्लभ संयोग असण्याबरोबरच शुभ योग देखील मानला जातो. खरंतर, 2026 मध्ये गुरु ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार आहे तर शनि संपूर्ण वर्षभर मीन राशीत स्थित असणार आहे. 

Continues below advertisement

इतकंच नव्हे तर, 2026 मध्ये हंस महापुरुष राजयोग, बुधादित्य योग, महालक्ष्मी योग आणि गजकेसरी योगासह अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. त्यामुळे या योगांचा प्रभाव अनेक राशींच्या मान-सन्मानात वाढ करेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या व्यवहारात आर्थिक मजबूती येईल. यासाठीच, 2026 मध्ये कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष गुरु आणि शनिच्या युतीमुळे दिर्घकाळासाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात शनिची स्थिती मजबूत असेल आणि महालक्ष्मी योग जुळून येणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता येईल. मेहनत, शिस्त आणि धैर्याने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगला टप्पा गाठाल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, करिअरशी संबंधित तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. सामाजिक स्तर वाढेल. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष भरभराटीचं जाणार आहे. या काळात तुम्ही जे ध्येय गाठण्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत होतात ते हळुहळू पूर्ण होताना दिसेल. या कालावधीत तुम्हाला करिअर, रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत चांगले परिणाम पाहायला मिळतील. तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2026 फार खास असणार आहे. विशेषत: जून महिन्यात जेव्हा गुरु ग्रह आपल्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या नशिबाचे दार खुलतील. या दरम्यान गजकेसरी योग निर्माण होणार आहे. या काळात तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट पाहायला मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2026 सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. या काळात तुम्ही राबवलेल्या योजना यशस्वी होतील. जे लोक विवाहाची वाट पाहात होते त्यांचा विवाह या दरम्यान होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरचा आणि व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल. शनिच्या संक्रमणाने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा नेमका कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य