The Wire Fame Actor James Ransone No More: हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते जेम्स रॅन्सोन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 46व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनरच्या मते, जेम्स रॅन्सोन यांनी शुक्रवारी आयुष्य संपवलं. घरातच ते मृतावस्थेत आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, रॅन्सोन हे भयपट मालिका आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जातात. रॅन्सोन या प्रसिद्ध कलाकाराच्या निधनानंतर चित्रपट तसेच टेलिव्हिजन जगतातून शोक व्यक्त केला जात आहे.
जेम्स रॅन्सोन हे एचबीच्या आयकॉनिक क्राइम ड्रामा मालिका 'द वायर' मधील चेस्टर जिग्गी सोबोटकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये त्यांनी गुन्हेगारीच्या जगतात अडकलेल्या एका डॉक वर्करची भूमिका साकारली होती. जेम्स रॅन्सोनच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही खूप कौतुक केले होते. या भूमिकेमुळे त्यांना टेलिव्हिजन जगतात वेगळी ओळख मिळाली होती.
या व्यतिरिक्त, रॅन्सोनने एचबीओच्या जनरेशन किल या मिनीसीरीजमध्ये त्यांनी कॉर्पोरल जोश रे पर्सनची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांनी अलेक्जेंडर स्कार्सगार्ड यांसारख्या कलकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती. दोन दशकांहून अधिक काळ त्याने टेलिव्हिजन तसेच सिनेमात उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीतून त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेम्स रॅन्सोन यांचा जन्म 1979साली बाल्टिमोर येथे झाला. नंतर त्यांनी आर्ट स्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी २००० साली मालिकांमधून आपल्या करिअरची सुरूवात केली. "द वायर" च्या दुसऱ्या सिझनमधील झिग्गी सोबोटका या पात्रामुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली. 'बॉश', 'पोकर फेस' तसेच 'मोजेक' या मालिकांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी अनेक हॉरर चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. जेम्स रॅन्सोन यांचा 'ब्लॅक फोन 2' हा चित्रपट शेवटचा ठरला. हा चित्रपट ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण या चित्रपटात त्यांची भूमिका दमदार ठरली.
दरम्यान, जेम्स रॅन्सोन यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या: