Zwigato Twitter Review : दिग्दर्शक नंदिता दास यांचा ‘झ्विगॅटो’ (Zwigato) हा चित्रपट प्रेक्षकांच्या आज (17 मार्च) भेटीस आला आहे. या चित्रपटात कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेत्री शहानाने कपिलच्या पत्नीची भूमिका चित्रपटात साकारली आहे. आता ‘झ्विगॅटो’ या चित्रपटाचा रिव्ह्यू काही नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. 


टोरंटो आणि बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘झ्विगॅटो’चे प्रीमियर झाले. तेव्हापासूनच हा चित्रपट चर्चेत होता. आता आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ‘झ्विगॅटो’ चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 


एका नेटकऱ्याने झ्विगॅटोबाबत ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्या युझरने लिहिलं, "झ्विगॅटो’ ही एका कुटुंबाची कथा आहे, जी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडली आहे. नंदिता दास यांच्या या चित्रपटात अनेक चांगले क्षण आहेत, कपिल शर्माने खूप चांगलं काम केलं आहे."






अभिनेत्री शहनाज गिलने देखील झ्विगॅटो हा चित्रपट पाहिला. तिने ट्विटरवर ट्वीट शेअर करुन चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'आज मी भारताच्या फनी मॅनची एक वेगळी बाजू मांडली. मला चित्रपटातील प्रत्येक क्षण आवडला. चित्रपटाची कथा खूप छान आहे. दिगदर्शन चांगले आहे तसेच कलाकारांचा अभिनय देखील चांगला आहे. '






अदनान सामीने देखील ट्विटरवर ट्वीट शेअर करुन झ्विगॅटो चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Zwigato Trailer : हम मजदूर हैं , इस लिए मजबूर हैं.! कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत, Zwigato चा ट्रेलर लाँच