Zwigato And Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दिग्दर्शक नंदिता दास (Nandita Das) आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) यांचा 17 मार्च  रोजी झ्विगॅटो (Zwigato) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar)  हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जीचा (Rani Mukerji) 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे'  (Mrs Chatterjee Vs Norway) हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला.  जाणून घेऊयात या चित्रपटांच्या कलेक्शनबाबत...


झ्विगॅटोचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 



झ्विगॅटो या चित्रपटात कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शहानाने कपिलच्या पत्नीची भूमिका चित्रपटात साकारली आहे. ओपनिंग-डेला या चित्रपटानं 42 लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटानं  65 लाख कमावले आहेत. आता या चित्रपटाची एकूण कमाई 1.7 कोटी रुपये एवढी झाली आहे. आता रविवारी हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. टोरंटो आणि बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘झ्विगॅटो’चे प्रीमियर झाले. तेव्हापासूनच हा चित्रपट चर्चेत होता. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ‘झ्विगॅटो’ चित्रपटाचं कौतुक केलं.  अभिनेता कार्तिक आर्यनने देखील या चित्रपटात कॅमिओ केला आहे. ‘प्यार का पंचनामा’ दिग्दर्शक फेम लव्ह रंजनने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 


‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन



रणबीर आणि श्रद्धा यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. शनिवारी या चित्रपटानं 6 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं आतापर्यंत  102.21  कोटी कमावले आहेत. कोरोनानंतर 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा सातवा चित्रपट आहे. 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे.  रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून बोनी कपूर यांनी अभिनयात पदार्पण केलं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Zwigato Twitter Review: कसा आहे कपिल शर्माचा Zwigato चित्रपट? नेटकरी म्हणतात...