youtuber ranveer allahbadia Apology : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया याने पालकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संताप व्यक्त करण्यात आला. रणवीरने लवकरत लवकर माफी मागावी अशी मागणी केली जाऊ लागली. दरम्यान, लोकांमध्ये वाढत्या संतापाची दखल घेत रणवीर अलाहबादियाने त्याने केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितली आहे. 

पालकांबाबत केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य

रणवीर अलाहबादिया याने एक्सवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत पालकांबाबत केलेल्या विधानासंदर्भात त्याने जाहीर माफी मागितली आहे. विनोद हे माक्षे क्षेत्र नाही. मी जे विधान केले आहे, ते करायला नको होते. मला माफ करा, असं त्याने म्हटलंय. 

अलाहबादियाच्या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे? 

रणवीर अलाहबादिया अलाहबादियाने एक्सवर एकूण 52 सेकंदांचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत तो माफी मागताना दिसतोय. "मी केलेले विधान योग्य नव्हते. सोबतच त्यामध्ये कोणतीही विनोदबुद्धी नव्हती. कॉमेडी हे माझे क्षेत्र नाही. मी माफी मागतो. तुम्ही कदाचित विचाराल की तू अशा पद्धतीने तुझ्या मंचाचा उपयोग करतो का? तर याचे उत्तर नाही असे आहे. जे काही घडले, त्याबाबत मला कुठलेही स्षष्टीकरण, कारण द्यायचे नाही. मला फक्त माफी मागायची आहे," असे रणवीर अलाहबादियाने म्हटले आहे. 

मी माझ्यात सुधारणा घडवून आणेन

इंटरनेट, सोशल मीडियावरील मंचाचा चांगल्या कामासाठी वापर होऊ शकतो, हे मी या अनुभवातून शिकलो आहे. मी माझ्यात सुधारणा घडवून आणेन. तसेच जो संवेदनशील भाग आहे तो काढून टाकण्याचीही मी विनंती करतो. शेवटी एक मणुष्यप्राणी म्हणून तुम्ही मला माफ कराल, अशी आशा व्यक्त करतो, असंही रणवीर अलाहबादियाने म्हटलंय.

व्हिडीओ हटवण्याचे निर्देश

दरम्यान, रणवीर अलाहबादियाच्या विधानानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तो व्हिडीओ यूट्यूबवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ आणि यूट्यूब चॅनेलनचे नाव पोलिसांकडे द्यावे, असा आदेशही दिला आहे.

हेही वाचा :

रणवीर अलाहबादियाच्या अडचणी वाढणार, मानवी हक्क आयोगाने घेतली 'त्या' अक्षेपार्ह विधानाची; थेट यूट्यूबला दिला महत्त्वाचा आदेश!

Ranveer Allahbadia : आई-वडिलांबाबत Vulgar प्रश्न विचारणाऱ्या रणवीर अलाहबादियाची संपत्ती किती? महिन्याभराची कमाई ऐकून बसेल धक्का

Ranveer Allahbadia Vulgar Remark: रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत विचारला वल्गर प्रश्न; युजर्स म्हणाले, "तुझ्या बापाला जाऊन विचार..."