Ranveer Allahbadia Controversial Comments on Samay Raina Show : प्रसिद्ध यूट्यूबल रणवीर अलाहबादिया सध्या चांगलाच वादात सापडला आहे. त्याने प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटेन्ट' या कार्यक्रमात पालकांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर देशभरात रणवीर अलाहबादिया याच्यावर तसेच समय रैनाच्या शोवर सडकून टीका केली जात आहे. अलाहबादिया याने लवकरत लवकर माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. असे असतानाच आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची दखल घेत रणवीर अलाहबादियाने ज्या शोमध्ये हे विधान केलेले आहे, तो शोच यूट्यूबवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
व्हिडीओ यूट्यूबवरून हटवण्याचे निर्देश
रणवीरच्या कमेटमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून हा व्हिडीओ लवकरात लवकर हटवून टाकावा, अशी मागणी केली जात आहे. लोकांच्या याच भावना तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी रणवीर अलाहबादिया याने पालकांच्या लैंगिक संबंधावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडीओ यूट्यूबवर हटवण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी भारतातील यूट्यूबच्या सार्वजनिक व्यवहाराच्या प्रमुख मिरा छाट यांना लिहिले आहे.
प्रियांक यांनी यूट्यूबला लिहिलेल्या पत्रात नेमके काय आहे?
प्रियांक यांनी मिरा छाट यांना लिहिलेल्या पत्रात रणवीर अलाहबादियाने केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडीओ यूट्यूबवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. ही कारवाई लवकरात लवकर करावी, असं त्यांनी पत्रात म्हटलंय. तसेच हा व्हिडीओ यूट्यूबवरून हटवण्याआधी संबंधित व्हिडीओ तसेच यूट्यूब चॅनेलचने नाव पोलीस प्रशासनाला द्यावा. ज्या ठिकाणी या प्रकरणात तक्रार करण्यात आलेली आहे, त्या पोलिसांनी ही सर्व माहिती द्यावी आणि नंतर यूट्यूबवरून तो व्हिडीओ हटवावा, असेही प्रियांक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दहा दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचा आदेश
यासह सर्व कारवाई केल्यानंतर कारवाईचा एक रिपोर्टही राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला आगामी 10 दिवसांच्या आत पाठवावा, असा आदेशही देण्यात आला आहे.
दरम्यान, रणवीर अलाहबादिया हा अवघ्या 31 वर्षांचा प्रसिद्ध यूट्यूबर आहे. यूट्यूबच्या जिवावर त्याने आज कोट्यवधींची संपत्ती कमवलेली आहे. त्याचे एकूण 12 यूट्यूब चॅनेल्स आहेत. त्याची एकूण संपत्ती 60 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा :