Vicky Kaushal Chhaava Movie: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या आगामी 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या संपूर्ण सिनेमाची स्टार कास्ट जोरदार प्रमोशन करत आहे. तसेच, विक्कीनं सध्या चित्रपटासंर्भात अनेक खळबळजनक  आणि आश्चर्यचकीत करणारे खुलासे केले आहेत. 

चित्रपटातील विक्की कौशलचा लूक आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन खूपच चर्चेत आहे. विक्कीनं सांगितलं की, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) लूकबाबत फारच कॉन्शिअस आणि स्ट्रिक्ट होते. एकवेळ अशी होती की, त्यांनी चित्रपटाचं शुटिंग सुरू करण्यास थेट नकार दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की, जोपर्यंत विक्कीचा अपीयरेंस एखाद्या खऱ्या योद्ध्यासारखा होत नाही, तोपर्यंत ते शुटिंग सुरू करणार नाहीत.

दिग्दर्शकांचा फिल्मचं शुटिंग सुरू करण्यास नकार अन्... 

रेडिओ नशाशी बोलताना विक्कीनं सांगितलं की, "छावा' हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये साकारलेली पात्र सर्वात कठीण होती, कारण एकाच वेळी 25 किलो वजन वाढवणं सोपं नसतं. ते माझ्यासाठी खूप कठीण होतं. हे वजन वाढवण्यासाठी मला 7 महिने लागले. लक्ष्मण सरांनी स्पष्टपणे सांगितलेलं की, जोपर्यंत तुझा लूक एखाज्या योद्ध्यासारखा होत नाही, तू घोडेस्वारी शिकत नाही, तलवारबाजीचे पूर्ण प्रशिक्षण घेत नाही आणि अॅक्टिंग फायटिंग शिकत नाही, तोपर्यंत मी चित्रपट सुरू करणार नाही. त्यावेळी ते मला म्हणाला की, "मी माझ्या प्रेक्षकांना फसवणार नाही. मी VFX चा वापर करणार नाही."

2000 ज्युनिअर आर्टिस्टसोबत केलं काम 

विक्कीनं पुढे बोलताना सांगितलं की, मला माझे केस आणि दाढी वाढवायची होती आणि पिळदार शरीरही बनवायचं होतं. सिनेमाची शुटिंग सुरू होण्यापूर्वी यामध्येच फार वेळ गेला. जर तुम्ही सेटवर 2000 लोकांना पाहिलं, तर वास्तवात सेटवर 2000 लोक होते. आमच्याकडे 2000 ज्युनिअर आर्टिस्ट आणि देशातील 500 सर्वोत्तम स्टंटमॅन होते. त्यांनी अत्यंत ग्राऊंड लेव्हलवर आणि गंभीररित्या शूट केलं आहे. 

अक्षय खन्नाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून घाबरलो : विक्की कौशल 

'छावा'मध्ये मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना साकारत आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी अत्यंत खतरनाक ट्रान्सफॉर्मेशन केलंय, त्याबाबत बोलताना विक्की कौशल म्हणाला की, "मला त्यांच्या लूक्सचे फोटो दाखवण्यात आले आणि मी पुरता हैराण झालो. मला विश्वासच बसत नव्हता. जेव्हा मी अॅक्चुअलमध्ये सेटवर त्यांचा लूक पाहिला, त्यावेळी त्यांचं वागणं, हावभाव सर्वकाही विश्वास करण्यापलिकडचं होतं. मी हैराण होतो. त्यांनी करंच भूमिकेला जिवंत केलं. त्यांची क्रूरता एवढ्या योग्य पद्धतीनं अभिनयातून व्यक्त झाली आहे की, सारेच हैराण झाले."

दरम्यान, 'छावा'मध्ये विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आणि अक्षय खन्ना मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी रिलीज केला जाणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amitabh Bachchan 1600 crore Property Heir: अमिताभ बच्चन यांच्या 1600 कोटींच्या संपत्तीचा वारसदार कोण? नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!