Ranveer Allahbadia Vulgar Remark on Parents : प्रसिद्ध यूट्यूबर बीअरबायसेप्स म्हणजेच रणवीर अलाहबादिया पालकांवरील एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांगलाच वादात सापडला आहे. 31 वर्षीय यूट्यूबर वल्गर कॉमेडी करण्याच्या नादात अडचणीत सापडला आहे. रणवीर अलाहबादिया अलीकडेच समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये पॅनेललिस्ट म्हणून सामील झाला होता. यावेळी त्याने पालकांच्या लैगिंक संबंधांबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यानंतर त्याला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. 31 वर्षीय युट्यूबर रणवीर अलाहबादियाचे अनेक यूट्यूब चॅनल्स असून त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. रणवीर यूट्यूबद्वारे कोट्ववधींची कमाई करतो. त्याची कमाई आणि संपत्ती याबद्दल जाणून घ्या.


कोण आहे रणवीर अलाहबादिया?


रणवीर अलाहबादियाचा जन्म 2 जून 1993 रोजी मुंबईत झाला. त्याचं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून झालं आहे. त्यानंतर त्याने द्वारकादास जीवनलाल संघवी कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून बी. टेक पदवी मिळवली. त्यानंतर त्याने यूट्यूब कंटेट बनवायला सुरुवात केली आणि आज तो देशातील आघाडीच्या यूट्यूबर्सपैकी एक आहे.


रणवीर अलाहबादियाची यूट्यूबची कमाई किती?


रणवीर अलाहबादियाने वयाच्या 22 व्या वर्षी यूट्यूब कंटेट बनवायला सुरुवात केली. त्याने स्वत:चं यूट्यूब चॅनल सुरु केलं आणि काही काळातच टॉप कंटेट क्रिएटर बनला. रणवीर अलाहबादिया फिटनेस, अध्यात्म आणि मोटिवेशनल पॉडकास्ट खूप प्रसिद्ध आहेत. बीयर बायसेप्स रणवीर अलाहबादियाचे 12 यूट्यूब चॅनेल आहेत. यावर सहा मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. यातून तो महिन्याला सुमारे 35 लाख रुपये कमावतो. 2022 मध्ये फोर्ब्स 30 अंडर 30 आशियाच्या यादीत त्याचा समावेश होता.


रणवीर अलाहबादियाची संपत्ती किती?


2024 पर्यंत रणवीर अलाहबादिया याची एकूण संपत्ती सुमारे 60 कोटी रुपये आहे. यूट्यूब चॅनलवरुन दरमहा होणाऱ्या कोट्यवधींच्या कमाईशिवाय तो जाहिरात, ब्रँड एंडोर्समेंट यातूनही मोठी कमाई करतो. तो भारतातील सर्वात श्रीमंत यूट्यूबर्सपैकी एक आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ranveer Allahbadia : "आई-वडिलांना शारीरिक संबंधावेळी बघणार का...", रणवीर अलाहाबादिच्या फालतू प्रश्नावर नेटकरी भडकले