Shivangi joshi : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ये रिश्ता क्या कहलाता है'या टीव्ही सीरियलने इंडस्ट्रीत तिची खास ओळख निर्माण केली आहे. या मालिकेतून शिवांगी घरोघरी नायरा या नावाने ओळखली जाते. सोशल मीडियावर ती आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते.चाहतेही तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असता. अशाच एका चाहत्याने शिवांगीला तू लग्न कधी करणार? असा प्रश्न विचाला. चाहत्याच्या या प्रश्नाला शिवानीने उत्तर दिले आहे. 


शिवांगी तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांची जोडी पडद्यावर चांगलीच पसंतीस उतरली आहे. दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही येत आहेत. परंतु,दोघांनीही याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.






शिवांगी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असताना चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. यापैकी एकाने शिवांगीला विचारले की, तूझे लग्न कधी होणार आहे? यावर शिवांगीने चाहत्यांना हटके असं उत्तर दिलं आहे. "बघेन आणि विचार करेन, उद्या किंवा परवा यावर काहीतरी बोलेन, असे उत्तर देत शिवांगीने हसणारे इमोजी पाठवले आहेत. 


याच वेळी एका एका चाहत्याने तिला विचारले की, तू कधी प्रेमात पडली आहे का? यावर शिवांगीने फिल्मी पद्धतीने उत्तर दिले आणि म्हणाली, अहो तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं आहे का? कधी कोणाला हृदय दिलं आहे? मी पण दिलं आहे. शिवांगीची ही स्टाईल तिच्या चाहत्यांनाही खूप आवडली आहे.


महत्वाच्या बातम्या