Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नसीरुद्दीन शाह 71 वर्षांचे असून ते ओनोमेंटमॅनिया (onomatomania) या आजाराने ग्रासले आहे. 


नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत आजारासंदर्भात माहिती दिली आहे. आजाराबद्दल बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले,"मी ओनोमेंटमॅनिया नावाच्या आजाराशी झुंज देत आहे". ओनोमेंटमॅनियाच्या आजारात एखादी व्यक्ती विशिष्ट शब्द किंवा वाक्य वारंवार उच्चारत राहते.





नसीरुद्दीन शाह यांची 'कौन बनेगी शिखरवती' ही वेबसीरिज नुकचीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही वेबसीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी एका राजाची भूमिका साकारली आहे.


संबंधित बातम्या 


Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड


Majhi Tujhi Reshimgath : यश-नेहाची रेशीमगाठ जुळता जुळेना, नेहासोबत चार प्रेमाचे शब्द यश बोलणार का?


Me Vasantrao : सांगीतिक रंगाची उधळण! शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत रंगला ‘मी वसंतराव’चा संगीत सोहळा!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha