KGF 2 Box Office Collection : यशचा 'केजीएफ 2' (KGF: Chapter 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. एका महिन्याच्या आता या सिनेमाने जगभरात 1160 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांना चांगलाच नफा मिळाला आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.  


भारतात 'केजीएफ 2' सिनेमाने केली 958 कोटींची कमाई


यशच्या 'केजीएफ 2' चे जगभरातील प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. जगभरात या सिनेमाने 1160 कोटींची कमाई केली असून भारतातदेखील या सिनेमाला सिनेप्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतात या सिनेमाने 958 कोटींची कमाई केली आहे. 


'केजीएफ 2'ची  गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट


'केजीएफ 2' सिनेमाने पहिल्या आठवड्यात 59.84 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 32.65 कोटींची कमाई केली आहे. तर तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 21.30 कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. चौथ्या आठवड्यात या सिनेमाने 127.12 कोटींची कमाई केली आहे.






'केजीएफ 2' सिनेमा पाच भाषेत प्रदर्शित 


'केजीएफ 2' या सिनेमात यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. प्रशांत नील यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम अशा पाच भाषेत प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


संबंधित बातम्या


KGF 2 : यशच्या 'केजीएफ 2'चा बोलबाला; सहा विक्रम केले नावावर


KGF 2 : 'केजीएफ 2' पाहताना चित्रपटगृहातच तरुणाचा मृत्यू, हत्येचा संशय, पोलिसांचा तपास सुरू


KGF 2 : 'केजीएफ 2' पाहताना चित्रपटगृहातच तरुणाचा मृत्यू, हत्येचा संशय, पोलिसांचा तपास सुरू