Yash Movie Title: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता यशच्या (Yash) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 'KGF 1' आणि 'KGF 2'  या   चित्रपटांच्या  यशानंतर यशचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशताच आता यशने त्याच्या चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. यशनं त्याच्या आगामी (Yash Movie Title) चित्रपटाची घोषणा केली आहे. 


यशच्या आगामी चित्रपटाचं नाव (Yash Toxic Movie)


यशच्या आगामी चित्रपटाचे नाव 'टॉक्सिक' असे आहे. यशनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन त्याच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या रिलीज डेटचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. यशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अर्धे जळालेले पत्ते दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक आकर्षक धून ऐकू येत आहे.  यशच्या दमदार लूकची झलक देखील या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये यश हा काउबॉय लूकमध्ये दिसत आहे. तो सिगार ओढताना दिसत आहे. त्याच्या एका हातात मोठी बंदूकही दिसत आहे.


कधी रिलीज होणार 'टॉक्सिक'? (Toxic Rlease Date)


यशचा टॉस्किक हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन हाऊसनं केली आहे. 






2018 मध्ये रिलीज झालेल्या यशच्या केजीएफ या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.  यशचा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या KGF Chapter 2 या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.   प्रशांत नील यांनी  केजीएफ चॅप्टर-2  या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  यशशिवाय यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी काम केले आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे.  आता यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात यशसोबतच कोणते कलाकार काम करणार आहेत? याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या:


KGF Chapter 2 : रॉकी भाईच्या चाहत्यांवरील इफेक्टबाबत यश म्हणाला, 'रॉकी तुमच्यात आणि माझ्यात...'