Junior Mehmood Passes Away: अभिनेता नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांचे निधन झाले आहे. ज्युनियर महमूद यांनी मुंबईतील खार येथील घरात अखेरचा श्वास घेतला. 67 वर्षीय ज्युनियर महमूद हे गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते, काही दिवसांपूर्वीच त्यांना या आजाराचे निदान झाले होते. ज्युनियर महमूद यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ज्युनियर महमूद यांचा मुलगा हसनैन यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, "18 दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांना पोटाच्या कर्करोगाची माहिती मिळाली होती. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डीन म्हणाले होते की, आता त्यांच्या आयुष्यातील केवळ दोन महिने शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना रुग्णालयात ठेवणे योग्य होणार नाही. आज दुपारी शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत."
ज्युनियर महमूद हे आजारी असताना जवळपास 700 लोक त्यांना भेटायला आले होते, त्यात जॉनी लीव्हर आणि जितेंद्र यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. ज्युनियर मेहमूद यांच्या तब्येतीची विचारपूस करताना जितेंद्र हे भावूक झाले होते. ज्युनियर महमूद यांनी कारवां या चित्रपटात जितेंद्र यांच्या लहान भावाची भूमिका साकारली होती. ज्युनियर मेहमूद यांना भेटण्यासाठी सचिन पिळगावकरही गेले होते. ज्युनियर मेहमूद यांना भेटल्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन नेटकऱ्यांना त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.
ज्युनियर महमूद यांचे चित्रपट
ज्युनियर महमूद यांनी 60 आणि 70 च्या दशकात बड्या कलाकारांसोबत काम केले. तसेच अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले. नौनिहाल, मोहब्बत जिंदगी है, संघर्ष, ब्रह्मचारी, फरिश्ता, हाथी पतंग, अंजाना, दो रास्ते, यादगार, आन मिलो सजना, जोहर मेहमूद ने हाँगकाँग, कारवां, हाथी मेरे साथी, छोटी बहू, चिंगारी, हरे राम गाता हरे, हरे राम गाता, चलने अनेक चित्रपट आणि काही मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते.
संबंधित बातम्या: