Animal Box Office Collection Day 7: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)   'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या सर्वाधिक ओपनिंग करण्याऱ्या चित्रपटाचा किताब पटकावला आहे. या चित्रपटामधील अॅक्शन सीन्सचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. आता  रिलीजच्या सातव्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन..

 'अ‍ॅनिमल' चं सातव्या दिवसाचं कलेक्शन (Animal Box Office Collection Day 7)

 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला आहे. 'अ‍ॅनिमल'  या चित्रपटाचा एका आठवड्यात जगभरात 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला, तर या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 300 टप्पा देखील ओलांडला आहे.

Day 1  63.8 कोटी 
Day 2   66.27 कोटी
Day 3   71.46 कोटी
Day 4   43.96 कोटी 
Day 5  37.47 कोटी
Day 6 

30.39 कोटी

Day 7 25.50 (सुरुवातीचे आकडे)
सात दिवसांची एकूण कमाई ₹ 338.85 कोटी

'संजू' चा रेकॉर्ड तोडणार अॅनिमल?

'अॅनिमल' चित्रपटाचे सात दिवसांचे एकूण कलेक्शन 338.85 कोटींवर पोहोचले आहे. हा चित्रपट सातव्या दिवसाच्या कलेक्शनसह 'संजू' या चित्रपटाचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड मोडेलस असा अंदाज लावला जात आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'संजू' चित्रपटाचे लाइफटाईम कलेक्शन 342.57 कोटी रुपये आहे.  त्यामुळे आता संजू या चित्रपटाला अॅनिमल चित्रपट मागे टाकणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची स्टार कास्ट (Animal Star Cast)

संदीप वंगा रेड्डी  (Sandeep Reddy Vanga)  यांनी दिग्दर्शित केलेला 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट पिता-पुत्राच्या  नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत, रश्मिका पत्नीच्या भूमिकेत आणि बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. 'अॅनिमल' या सिनेमाला सेन्सॉरने 'A' सर्टिफिकेट दिलं.

संबंधित बातम्या:

Animal Box Office Collection: बाहुबली, पठाण अन् जवानला टाकलं मागे; 'अॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, सहाव्या दिवशी केली एवढी कमाई