World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबाद येथे आज होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे. अनेक सेलिब्रिटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा हा सामाना पाहण्यासाठी अहमदाबाद येथे पोहोचले आहेत. अशातच आता अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने एबीपी न्यूजशी केलेल्या खास संवादात भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली. या मुलाखतीमध्ये सुनीलनं टीम इंडियाचं भरभरुन कौतुक केलं आहे.
रोहित शर्माबद्दल काय म्हणाला सुनील शेट्टी?
एबीपी न्यूजशी केलेल्या खास संवादात सुनील शेट्टी म्हणाला की, "भारताची कामगिरी प्रत्येक विभागात चांगली राहिली आहे जे भारताच्या विजयाचे कारण ठरले. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.". "संघाच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला द्यायला हवे", असे मत सुनील शेट्टीने व्यक्त केले.
सर्वजण चांगले खेळत आहेत: सुनील शेट्टी
सुनील शेट्टीनं भारतीय संघाच्या यशासाठी सांघिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की, "जेव्हा संपूर्ण संघ एक युनिट म्हणून खेळतो तेव्हा असे परिणाम येतात. हे कोणा एका खेळाडूच्या कामगिरीबद्दल नाहीये, तर सर्वजण चांगले खेळत आहेत."
जावई केएल राहुलच्या उत्कृष्ट कामगिरीशी संबंधित प्रश्नावर सुनील शेट्टीने वेगळे काही सांगितले नाही, यावेळी प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक केले. पुढे तो म्हणाला की, "आजचा अंतिम सामना कोणता संघ जिंकेल हे माहित नाही, हे आज रात्रीच कळेल."
अनेक सेलिब्रिटी आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत क्रिती सॅनननं विश्वचषकाच्या फायनलबद्दल भाष्य केली. ,"संपूर्ण विश्वचषकात भारताने चांगली कामगिरी केली आहे. आजही भारत चांगली कामगिरी करुन विश्वचषक जिंकेल अशी आशा आहे." असं ती म्हणाली.
अथियाने केएल राहुलसोबत जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीची मुलगी अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो' मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये अथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या:
World Cup Final : भारत आज चांगली कामगिरी करुन विश्वचषक जिंकेल : क्रिती सॅनन