मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं आज निधन झालं. 'दयावान' अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.


विनोद खन्ना यांना सर्व क्षेत्रातील दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

विनोद खन्ना यांच्यासोबत 'अमर,अकबर,अँथोनी' या सिनेमात अकबरची भूमिका साकारणाऱ्या ऋषी कपूर यांनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली.

अमर, आम्ही तुला विसरणार नाही, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं. इतकंच नाही तर त्यांनी आपला ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चरही बदलला.

https://twitter.com/chintskap/status/857487443913719808

दुसऱ्या एका ट्विटमध्ये ऋषी कपूर यांनी एक फोटो शेअर करुन, "तुमच्यासोबतच्या घालवलेल्या यादगार क्षणांच्या आठवणी ताज्या होत आहेत. माझा मित्र बनल्याबद्दल धन्यवाद" असं म्हटलं आहे.

https://twitter.com/chintskap/status/857497396569190400

ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांनी 'अमर,अकबर,अँथोनी' (1977), चांदणी (1989), 'इना मीना डिका' (1994) आणि 'टेल मी ओ खुदा (2011)' या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

https://twitter.com/chintskap/status/857526481869692931

https://twitter.com/chintskap/status/857527840769589248

विनोद खन्ना यांचं निधन

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी 11 वा. 20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

विनोद खन्ना शेवटचे ‘एक थी राणी’ या सिनेमात दिसले होते. यापूर्वी 2015 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या सिनेमातही विनोद खन्ना पाहायला मिळाले होते.

बॉलिवूडच्या दयावानचा अलविदा

विनोद खन्ना यांचा बॉलिवूडमध्ये दबदबा
विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथोनी’ यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या ‘हम तुम और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली.

राजकारणातही सक्रीय
विनोद खन्ना यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब अवलंबलं. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार होते.

संबंधित बातम्या

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन

बॉलिवूडच्या दयावानचा अलविदा

विनोद खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं?

'बाहुबली 2'चा प्रीमियर शो रद्द