Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हे दोघे 9 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत, असं म्हणलं जातय. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल सांगितले.
कियाराने मुलाखतीमध्ये सांगितले, 'विकी आणि कतरिना खरच लग्न करणार आहेत, की नाही हे मला माहित नाही. सध्या त्याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मला तरी लग्नाचे आमंत्रण आलेलं नाही.' काही दिवसांपूर्वी गजराज राव यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी विकी आणि कतरिनाच्या लग्नातील नियमाचा फोटो शेअर करून पोस्टमध्ये लिहीले, 'जर लग्नात फोन आणण्यास बंदी आहे, तर मला सेल्फी घेता येणार नाही. जर सल्फी घेऊ देणार नसतील तर मी लग्नाला जाणार नाही. '
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लस्ट स्टोरीज' या नेटफ्लिक्सच्या चित्रपटात कियारा आणि विकीने एकत्र काम केले होते. दोघांच्या या चित्रपटातील जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सलकरच कियारा कार्तिक आर्यनसोबत भूल भूलैया-2 या चित्रपटात दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल