Who Is Zainab Ravdjee: नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) यांच्यानंतर आता नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीचाही साखरपुडा झाला आहे. अखिल अक्किनेनी झैनब रावदजीची आपला जोडीदार म्हणून निवड केली आहे.  नागार्जुनची भावी धाकटी सून झैनब रावदजी कोण आहे आणि ती काय काम करते याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.


नागार्जुनने सोशल मीडियावर पोस्टमध्ये धाकट्या मुलाच्या लग्नाची घोषणा केली होती.  त्यामध्ये त्याने लिहिलं होतं की, 'आम्हाला आमचा मुलगा अखिल अक्किनेनी आणि आमची भावी सून झैनब रावदजी यांच्या साखरपुड्याची घोषणा करताना आनंद होत आहे. झैनबचे आमच्या कुटुंबात स्वागत करणं, यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही. त्यांच्या या नव्या आयुष्यासाठी  अगणित आशीर्वादांनी भरलेल्या शुभेच्छा द्या.        


कोण आहेत झैनब रावदजी? (जैनब रावदजी कोण आहे?


द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अखिल अक्किनेनीची होणारी बायको झैनब रावदजी ही मुंबईतील एक आर्टिस्ट आणि कला प्रदर्शक आहे. जैनबच्या इंस्टाग्राम बायोनुसार, ती एक लाईफस्टाईल ब्लॉगर आहे. ती स्किनकेअरवर तिचे ब्लॉग्ज तयार करत असते. हैदराबादची रहिवासी असलेली झैनब ही मुस्लिम कुटुंबातील आहे. ती उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगी आणि ZR रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अध्यक्ष झैन रावदजी यांची बहीण आहे.   


अखिल अक्किनेनी लग्न कधी करणार?


अखिल अक्किनेनी आणि झैनब रावदजी यांच्या साखरपुड्यानंतर नागार्जुनने त्यांच्या लग्नाबाबत माहिती दिली. लग्नाच्या तारखा अद्याप ठरल्या नसून पुढच्या वर्षी ते लग्न करू शकतात, असे त्यांनी सांगितले. अखिल आणि झैनब काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांनीही साखरपुडा करून त्यांच्या नात्याला अधिकृतपणे पुष्टी दिली आहे. 






ही बातमी वाचा : 


Bappi Lahiri Birthday: 'आता फक्त मंगळसुत्रच घालायचं राहिलंय..', बप्पी दांच्या सोनं घालण्यावरून 'या' ॲक्टरनं उडवली होती खिल्ली