Bappi Leheri Birthday: बॉलिवूडला ८० आणि ९० च्या दशकात आपल्या डिस्को स्टाईलचं वेड लावणारे बप्पी लहिरी यांचं नाव आलं की डार्क रंगाच्या टीशर्टवर मॅचिंग तलम ब्लेझर, गळ्यात सोन्याचे पाच सात लॉकेट,हात सोन्याचं चमकतं घड्याळ, दोन-चार कडे- (अर्थात सोन्याचे) डोळ्यावर गॉगल, आणि खांद्यापर्यंत रुळणारे कुरळे केस अशी चटकन एक प्रतिमा समोर येते. बप्पी दांच्या गाण्यांनी बॉलिवूडला डिस्को गाण्यांची आवड लावली. आता बप्पी दा आपल्यात नसले तरी त्यांच्या गाण्यांवर आजही बॉलिवूड चाहते थिरकतात. पण सोनं घालण्यावरून आज बप्पी लेहरींचा वाढदिवस आहे.
आता फक्त मंगळसूत्राची कमी..
बॉलिवूडचे डिस्को किंग आणि ओजी गोल्ड-मॅन, बप्पी लाहिरी, हे संगीतविश्वातील एक दिग्गज नाव आहेत. त्यांच्या चार्टबस्टर्समुळे ते ‘डिस्को किंग’ म्हणून ओळखले जातात. एकदा जेष्ठ अभिनेते राज कुमार यांनी सोनं घालण्यावरून बप्पी दांची थट्टा केली होती. बप्पी लहिरींच्या सोन्यावर असलेलं प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांना बप्पी दा एवढं सोनं का घालतात असा प्रश्न पडतो. त्यांच्या सोनं घालण्यावरून जेष्ठ अभिनेते राज कुमार यांनी बप्पी दांची खिल्ली उडवली होती. बप्पी लाहिरीच्या सोन्यावरील प्रेमावर सेलिब्रिटींनी नेहमीच मजेदार टिप्पण्या केल्या आहेत, आणि त्यात एक प्रसिद्ध नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेता राज कुमार. एक पुरस्कार सोहळ्यात बप्पी आणि राज पहिल्यांदाच भेटले, आणि त्याच वेळी राज कुमारने बप्पीच्या दागिन्यांच्या संग्रहावर अशी टिप्पणी केली: "वाह, शानदार. एक से एक गहाने, बस मंगळसूत्र की कमी रह गई है." ही टिप्पणी बप्पीला आवडली नाही आणि बप्पी दा नाराज झाले,असं सांगण्यात येतं.
बप्पी दा एवढं सोनं का घालायचे?
बप्पी लेहरी यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये २७ नोव्हेंबरला झाला. आलोकेश अपरेश लहीरी हे त्यांचं खरं नाव आहे. बॉलिवूडला आपल्या डिस्को सुरांनी घायाळ करणारे बप्पी दा त्यांच्या सोन्याच्या कलेक्शनसाठीही ओळखले जातात. पण बप्पी दा एवढं सोनं का घालायचे? सोन्याच्या चैन, अंगठ्या,लॉकेट आणि अंगभर दागिन्यांनी मढलेले बप्पी दा यांनी अमेरिकन पॉपस्टार एल्विस प्रेस्ले याला पहिल्यांदा जेंव्हा पाहिलं तेंव्हा त्यांनी सोनं घालायला सुरुवात केल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्या आईनं त्यांना पहिल्यांदा सोन्याचं लॉकेट घालायला दिल्याचं त्यांनी एका जुन्या मुलाखतीतही म्हटलं होतं. जेंव्हा त्यांनी सोन्याचं ते लॉकेट घातलं त्यानंतर त्यांना जखमी चित्रपटाची ऑफर आली होती. त्यामुळं सोनं घालणं त्यांच्यासाठी लकी असल्याचा विचार करत त्यांनी सोनं घालायला सुरुवात केली ती शेवटपर्यंत.बप्पी लहिरी यांचा १५ फेब्रुवारी २०२२ला झोपेच्या आजारानं मृत्यू झाला. त्यांना स्लिप डिसॉर्डर झाला होता. यात झोपेत श्वास घेण्यास होणारा त्रास असह्य होतो.