Brahmastra : दिग्दर्शक अयान मुखर्जीचा (Ayan Mukerji)   ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील केसरिया गाण्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. आता यावर अयान मुखर्जीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

काय म्हणाला अयान?

चित्रपटातील डायलॉग्समुळे आणि केसरिया या गाण्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. याबाबत अयान मुखर्जी म्हणाला, 'जेव्हा आम्ही केसरिया गाणं ऐकलं तेव्हा आम्ही 48 तास विचार केला की, या गाण्याला लोक ट्रोल का करत आहेत? पण त्यानंतर हे गाणं सुपरहिट ठरलं. यावरुन लक्षात येतं की लोक वेगवेगळा विचार करतात.'

Continues below advertisement

ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल होत आहेत. 

चित्रपटातील डायलॉग्सला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

चित्रपटातील आलियाच्या डायलॉग्सला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. एका मुलाखतीमध्ये अयानला ब्रह्मास्त्र चित्रपटातील डायलॉग्सला ट्रोल करणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अयाननं उत्तर दिलं, 'चित्रपटातील काही पार्टच्या डायलॉगला ट्रोल केलं जातंय का? काही डायलॉग्स हे पेपरवर चांगले वाटतात. जेव्हा केसरिया गाणं रिलीज झालं तेव्हा त्यामधील लव्ह स्टोरिया या शब्दाला देखील लोकांनी ट्रोल केलं होतं. पण आता हे गाणं सुपरहिट ठरलं आहे. आता डायलॉग्सचं पण असंच असू शकतं.'

अयाननं ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत देखील सांगितलं. दोन वर्षांनी म्हणजेच 2025 मध्ये ब्रह्मास्त्रचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी माहिती अयाननं दिली होती. ब्रह्मास्त्र चित्रपटानं जवळपास 160 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटातील VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

काही दिवसांपासून बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चित्रपट रिलीज होण्याआधी सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरु झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते.  या ट्रेंडाचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होईल, असं म्हटलं जात होतं. पण सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

'ब्रह्मास्त्र' मधील डायलॉग्सला ट्रोल करणाऱ्यांना दिग्दर्शक अयान मुखर्जीनं दिलं उत्तर; म्हणाला...