Kamaal Rashid Khan :  कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ ​​केआरकेला काही दिवसांपूर्वी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी आणि चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. जवळपास दहा दिवसांनी केआरकेला जामीन मिळाला.  जामीन मिळाल्यानंतर कमाल हा वेगवेगळे ट्विट्स ट्विटरवर शेअर करत आहे. नुकतच त्यानं एक ट्वीट शेअर केलं. तो राजकारणामध्ये एन्ट्री करणार आहे, असं त्यानं या ट्वीटमध्ये सांगितलं. 


केआरकेचं ट्वीट 
'मी  राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. कारण देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नसून नेता असणे महत्त्वाचे आहे.' असं ट्वीट केआरकेनं शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. एका नेटकऱ्यानं केआरकेच्या ट्वीटला कमेंट केली, 'सर तुम्ही राजकिय पक्ष स्थापन करा. ' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, 'सर, तुमच्यासोबत जेलमध्ये काय काय झालं ते सांगा.'






सांगितलं होता कारागृहातील अनुभव


केआरकेनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये केआरकेनं लिहिलं, 'कारागृहात दहा दिवस मी फक्त पाणी पिऊन काढले. त्यामुळे माझं वजन दहा किलो कमी झालं.' केआरकेच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 


सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता. हिंदी आणि  भोजपुरी चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं.


बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य कमाल करत असतो. तसेच वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देखील तो सोशल मीडियावर शेअर करतो. आता केआरके ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा रिव्हू करणार का? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Kamaal Rashid Khan : 'मी बदला घ्यायला परत आलोय'; जामीन मिळाल्यानंतर केआरकेचं पहिलं ट्वीट