The Kerala Story:   'द केरळ स्टोरी' (The Kerala Story)  या चित्रपटाला काही लोक सपोर्ट करत आहेत तर काही लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या चित्रपटाच्या कथानकावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. आता 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने बंदी घातली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्णयाबाबत सांगितलं. 


"पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 






"द काश्मीर फाइल्स" म्हणजे काय? हा चित्रपट लोकांच्या एका सेक्शनचा अपमान करतो. "द केरळ स्टोरी" म्हणजे काय? तर ही विकृत कथा आहे", असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 






पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान विपुलने म्हटले आहे की,'बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यास आम्ही कायदेशीर मार्ग स्वीकारू'






अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या:


The Kerala Story:   वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी'ला शबाना आझमींचा सपोर्ट; ट्वीट शेअर करत म्हणाल्या...