Welcome To The Jungle:  बॉलिवूडचा खिलाडी कुमार अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'वेलकम 3' म्हणजेच 'वेलकम टू जंगल' (Welcome To The Jungle) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. नुकताच अक्षयनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय हा लारा दत्ता (Lara Dutta), अरशद वारसी (Arshad Warsi), दिशा पटानीसोबत (Disha Patani) सीन शूट करताना दिसत आहे.


अक्षयनं शेअर केला व्हिडीओ


अक्षयनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये  दिसत आहे की अक्षय कुमार आणि अरशद वारसी हे  उंचीवर उभे आहेत. त्यानंतर लारा दत्ता त्या दोघांना चाबूक मारत आहे. दोघेचा बॅलेन्स बिघडतो.  त्यानंतर अक्षय कुमार खाली पडतो.   व्हिडीओ शेअर करुन खिलाडी कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वेलकम टू जंगल चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. पुन्हा वेडेपणा आणि मजेला सुरूवात झाली आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे." अक्षयनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


पाहा व्हिडीओ:






'वेलकम टू जंगल' मध्ये हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका (Welcome To The Jungle Cast)


अक्षय कुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, परेश रावल, संजय दत्त, जॉनी लीव्हर, तुषार कपूर, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, मिका सिंह, राजपाल यादव, दलेर मेहंदी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  'वेलकम टू द जंगल' या चित्रपटामध्ये 24 कलाकार कॅपेला सादर करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षयनं एक मजेशीर व्हिडीओ शेअर करुन  'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हा अक्षयनं या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली होती. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे, अशी माहिती अक्षयनं दिली होती.  आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 
संबंधित बातम्या:


Welcome to the Jungle Teaser: अक्षय कुमारनं वाढदिवसाला दिलं चाहत्यांना खास गिफ्ट; शेअर केला 'वेलकम टू द जंगल'चा मजेशीर टीझर