Dunki First Review: अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खास ठरले. किंग खानचा यावर्षी रिलीज झालेला 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला  तर त्याच्या 'जवान' (Jawan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर  रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता 2023 हे वर्ष संपत आले  आहे, अशातच शाहरुख हा त्याच्या चाहत्यांच्या 2023 या वर्षाचा शेवट मनोरंजनानं करणार आहे. त्याचा डंकी (Dunki) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू  मूव्ही हब नवाच्या  एका ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात डंकी चित्रपटाच्या पहिल्या रिव्ह्यूबाबत...


कसा आहे शाहरुखचा डंकी? (Dunki First Review)


मूव्ही हब नवाच्या ट्विटर अकाऊंटवरुन डंकी या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू शेअर करण्यात आला आहे. यामध्ये लिहिलं आहे, डंकी हा चित्रपट राजकुमार हिरानी यांच्या स्टोरी टेलिंगचा उत्कृष्ट नमुना आहे,  असा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीने यापूर्वी कधीही पाहिला नसेल. शाहरुख खानने या चित्रपटात सर्वोत्तम अभिनय केला आहे.चित्रपटाचा पहिला  भाग म्हणजे डंकीचा भारत ते लंडनचा प्रवास. हा भाग तुम्हाला पात्र, कथा, कॉमेडी, रोमान्स, प्रेम आणि मैत्री यांच्याशी जोडतो." 


"चित्रपटाच्या दुसरा भागात चित्रपटाची मुख्य कथा मांडण्यात आली आहे.जी पाहताना तुमचे डोळे पाणावतील.भारतीय चित्रपटसृष्टीत हा ऐतिहासिक सिनेमा ठरणार आहे.", असंही या रिव्ह्यूमध्ये लिहिण्यात आलं आहे.


 डंकी चित्रपटाच्या या  रिव्ह्यूच्या सत्यतेबद्दल नेटकऱ्यांनी विचारल्यानंतर मूव्ही हब पोर्टलने उत्तर दिले, 'भारतातील  ड्रिस्ट्रिब्यूटर्ससाठी 2 दिवसांपूर्वी  या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. हा रिपोर्ट त्यापैकी एका मोठ्या वितरकाचा आहे." या रिव्ह्यूमध्ये डंकी या चित्रपटाला पाच स्टार्स देण्यात आले आहेत. 






कधी रिलीज होणार डंकी? (Dunki Release Date)


 शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल आणि अभिनेता बोमन इराणी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 


संबंधित बातम्या:


Dunki Drop 5: किंग खान आणि तापसीचा रोमँटिक अंदाज; डंकी चित्रपटातील 'ओ माही' गाणं रिलीज