मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एका पाठोपाठ एक नवे आणि अतिशय धक्कादायक खुलासे होत आहेत. सुशांतसिंग राजपूत आणि त्यांचे रिलेशनशिप मॅनेजर हरीश यांच्यात व्हॉट्सअॅप चॅट एबीपी माझाच्या हाती लागले आहे. ज्यात सुशांतला आपल्या पैशांची चिंता होत होती असे चॅटवरून दिसत आहे.


सुशांतला आपले पैसे इतरांपासून सुरक्षित ठेवण्याची इच्छा होता. सुशांतला त्याचा खर्च कमी करायचा होता. सुशांतला त्याच्या अकाऊंट अॅक्सेसवर नियंत्रण ठेवायचं होतं. आपल्या कष्टाने कमावलेली रक्कम सुरक्षितपणे गुंतवायची होती. तर मग काय कारण आहे की, दुसऱ्यांवर खूप खर्च करणारा सुशांत, गरीबांना मदत करणारा सुशांत, कोट्यावधी पूरग्रस्तांना मदत करणारा सुशांत अचानक त्याच्या पैशांची चिंता करू लागला.


20 मे 2020 रोजी सुशांत आणि त्याचे बँक रिलेशनशिप मॅनेजर हरीश यांच्यातील संभाषण


सुशांत - हाय हरीश, मी सुशांतसिंग राजपूत बोलत आहे. कृपया आपल्याकडे वेळ असल्यास युरोपला कॉल करा.


हरीश - हाय, मी तुम्हाला फॉर्मवर सही करेल. कोणता ईमेल आयडी फॉर्म पाठवायचा?


या चॅटने हे सिद्ध होते की, सुशांतला त्याच्या बँक खात्यात काही बदल करायचे होते. ते बदल काय होते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सीबीआय, ईडी हरीश चा जबाब घेणार आहेत.



तपास अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ, मिरांडा, केशव आणि नीरज या चौघांनी सुशांतचा पैसा रिया खर्च करत असल्याचे सांगितलं आहे. रियाच्या सांगण्यावरून सुशांतच्या खात्यातून सतत पैसे काढण्यात येत होते.या चौघांनीही तपास यंत्रणेला सांगितले आहे की, रिया आणि तिचा भाऊ अनेकदा सुशांतबरोबर राहत असत आणि कधीकधी रियाचे आई-वडीलही सुशांतच्या घरी रहायला येत असत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत सुशांत आणि रिया यांच्यात पैशांमुळे भांडण ही झालं होत. त्यानंतर रियाने जानेवारी महिन्यात सुशांतला सोडले. त्यानंतर सुशांतने सिद्धार्थला त्याच्यासोबत राहण्याचे आमंत्रण दिले.


तपास यंत्रणेला दिलेल्या निवेदनात सिद्धार्थ म्हणाले की, ‘जानेवारी 2020 च्या दुसऱ्या आठवड्यात सुशांत सिंग यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी अॅक्टिंग सोडत असून आपण दीडशे ड्रीम प्रोजेक्ट वर काम करू आणि त्यांची मनाची स्थिती नीट नसल्याचंही त्यांनी मला सांगितलं.माझी नुकतीच नोकरी लागली असल्याचं मी त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी मला यावेळेस पगार देण्याचे सांगितले. मग मी अहमदाबाद येथून सुशांत सिंग माऊंट ब्लॅक येथील घरात गेलो तेव्हा सुशांत बेडरूम मध्ये बसले होते मला पाहताच त्यांनी मला मिठीत घेतलं आणि ते रडू लागले आणि त्यांनी मला सांगितलं की मी अॅक्टिंग सोडणार असून घरातल सर्व सामान विकून आणि पवना डॅम येथील फार्महाऊसवर शिफ्ट होऊ. तसेच आपल्याला यापुढे तीस हजार रुपये महिन्यात घर चालवायचं आहे.पवना डॅम येथे शेती करू असे सांगितले. त्याच वेळी त्यांनी मला त्यांच्या समोरील रूममध्ये राहण्यास सांगून दिपेशला ही आपण येथे राहण्यास बोलवलं असल्याच सांगितलं. मी जेव्हा रिया बद्दल विचारलं त्यावेळेस त्यांनी रडायला सुरुवात केली आणि सांगितलं की सर्व मला सोडून गेले. सदरचे घर हे डिसेंबर 2019 मध्ये घेतल्याचे मला कळले. हाऊस मॅनेजर मिरांडा यांच्याकडे विचारणा केली असता तेव्हा मला कळेल की, रिया चक्रवर्ती सुशांतच्या कार्डवरून खूप शॉपिंग करायची.'


सुशांतच्या बँक खात्यांच्या पाच वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालात सुशांतने पाच वर्षांत 34 कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचेही सूत्रांनी उघड केले आहे. सुशांतने हे खर्च मित्रांवर, टूरसाठी, आरामदायी आयुष्यासाठी खर्च केले. सुशांतला हे ठाऊक नव्हते की, त्याने कष्टाने कमावलेला पैसा खूप खर्च होत आहेत. शेवटच्या काळात त्याने बर्‍याच लोकांवर पैसे उडवले. सुशांतला यापुढे आपले पैसे खर्च करायची इच्छा नव्हती. आपल्या भावी भविष्यासाठी त्याला त्याचे पैसे सुरक्षित ठेवायचे होते.


रिया आणि तिच्या कुटुंबीयांनासुद्धा सुशांतच्या पैशांच्या गुंतवणूकीवर नियंत्रण ठेवायचे होते. ही ॲाडियो क्लिप याचा पुरावा आहे की जिथे सुशांतच्या पैशांची गुंतवणूक कुठे करायची आणि कशी करायची याचा निर्णय देखील रिया आणि तिचे कुटुंब घेत होतं.



सुशांतने भविष्यातील गुंतवणूकीसाठी सुशांत यांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानंतर सुशांतने काही निर्णय घेतले आणि त्याच अनुषंगाने सुशांतने त्याच्या रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधला.


आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये दिलदार सुशांतला त्याच्या पैशाचे महत्त्व समजले. त्यामुळे त्यांनी सिद्धार्थला दरमहा घर खर्चासाठी तीस हजार रूपये वापरण्यास सांगितले. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, दरमहा सुशांतचे लाखो रुपये घरगुती खर्चासाठी वापरले जात असत. रिया आल्यानंतर हे खर्च आणखी वाढले. याबाबत रिया आणि सुशांतमध्ये वादही झाले. सीबीआय शोध घेत आहे की, रियामुळे सुशांतला त्याच्या खर्चाची चिंता होती का? रिया सुशांतच्या पैशावर आपला खर्च करत होती का, त्यामुळे सुशांत रागावला? सुशांतचे पैसे त्याच्या संमतीशिवाय वापरले जात होते का? हे सिद्ध झाल्यास रियाच्या अडचणी आणखी वाढू शकतात. हे सिद्ध करण्यासाठी सुशांतच्या बँक अधिकाऱ्यांचा जबाब खूप महत्वाचे आहे.


संबंधित बातम्या :