Bollywood Industry: बॉलिवूड विश्वातील ‘किंग’ आणि ‘सुलतान’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या नावाची चर्चा अनेकदा होत असते. सलमान आणि शाहरुख त्यांच्या गेल्या काही चित्रपटांमधून आपली छाप सोडू शकले नसले तरी, त्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एक ट्विट करत बॉलिवूडचा ‘किंग’ आणि ‘सुलतान’ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता याबाबत एक ट्विट केले आहे. लोकांना आता या अभिनेत्यांच्या चित्रपटात रस नसून, चांगल्या कथांमध्ये रस असल्याचे मत व्यक्त केले आहे. मागील काही काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द कश्मीर फाइल्स’ हा एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे ज्याने IMDb च्या लोकप्रिय टॉप 5 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळेच 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटाचे उदाहरण घेत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. दिग्दर्शकाने दोन्ही अभिनेत्यांची नावे न घेता बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण सांगितले आहे.


काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?


दिग्दर्शकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्विट करत लिहिले की, 'जोपर्यंत हे किंग, बादशाह आणि सुलतान बॉलिवूडमध्ये राहतील, तोपर्यंत हिंदी सिनेमा बुडत राहील. लोकांना आवडणाऱ्या कथेवर चित्रपट बनवले तर, तरच बॉलिवूड जागतिक चित्रपट उद्योगाचे नेतृत्व करू शकेल. ही वस्तुस्थिती आहे.'


पाहा पोस्ट



विवेक अग्निहोत्री हे नेहमीच अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात. मात्र, सध्या त्यांच्या नावाची भरपूर चर्चा आहे. त्यांच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या चित्रपटातून खूप कौतुक मिळाले आहे. प्रेक्षकांच्या अफाट प्रेमाने विवेक अग्निहोत्री भारावून गेले आहेत. एका संवेदनशील विषयावर चित्रपट बनवल्यामुळे विवेक यांच्या प्रत्येक वक्तव्याला महत्त्व आले आहे.


हेही वाचा :


Kaali : 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी 'काली' दिग्दर्शिकेवर साधला निशाणा; म्हणाले, 'या वेड्या लोकांना...'


Akshay Kumar On The Kashmir Files : अक्षयनं केलं कश्मीर फाईल्सचं कौतुक; विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'हा तर अक्षयचा नाईलाज'