Akshay Kumar On The Kashmir Files : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)यांचा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सध्या चर्चेत आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रेक्षक आणि अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमारनं देखील या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. अक्षयचा तो व्हिडीओ शेअर करुन विवेक यांनी त्यांचे आभार देखील मानले होते. पण आता विवेक यांनी अक्षयनं केलेल्या कौतुकाबाबत वक्तव्य केलं आहे. 'चित्रपटाचं कौतुक करणं हा त्याचा नाईलाज होता.' असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.
एका चॅट शो दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की, चित्रपटाचं कौतुक करणं हा त्याचा नाईलाज होता. कारण तिथे 100 लोकांनी त्याला विचारलं असतं की, तुझा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही पण हा मात्र बॉक्स कसा धुमाकूळ घालतोय? या प्रश्नाला तो कसा उत्तर देऊ शकतो? आम्ही दोघेही भोपाळमध्ये एकाच कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यामुळे त्याला तसं म्हणावं लागलं.'
द कश्मीर फाईल्स हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा अक्षयचा बच्चन पांडे हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. बच्चन पांडे या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नव्हती. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
- Aai Kuthe Kay Karte : आशुतोषच्या गाडीचा भीषण अपघात! मित्र गमावण्याच्या भीतीने अरुंधतीला प्रेमाची जाणीव होणार?
- Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!
- Aai Kuthe Kay Karte : 'अशा अनुभवांना सामोरं जाण आपण सोडून देतो...'; 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीची पोस्ट चर्चेत