Kaali : सध्या काली (Kaali) या डॉक्युमेंट्रीमुळे चित्रपट दिग्दर्शक लीना मणिकेलाई (Leena Manimekalai) या चर्चेत आहेत. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता लीना यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटला रिप्लाय देत 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी लीना यांच्यावर निशाणा साधला आहे. 


लीना यांचे ट्वीट
'माझी काली क्वीर आहे. ती एक मुक्त आत्मा आहे. ती पितृसत्ता मानत नाही. ती भांडवलशाही नष्ट करते, ती तिच्या हजार हातांनी सर्वांना आलिंगन देते.' असं एका मुलाखतीमध्ये लीना यांनी सांगितलं होतं. हेच ट्वीट लीना यांनी शेअर केलं आहे. या ट्वीटला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी रिप्लाय दिला आहे. 






विवेक अग्निहोत्री यांचा रिप्लाय 
विवेक अग्निहोत्री यांनी लीना यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला की, 'कोणी तरी या वेड्या लोकांना संपवेल का प्लिज' विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 






काय आहे प्रकरण?


दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्या डॉक्युमेंट्रीचे नाव ‘काली’ आहे. लीना यांनी या डॉक्युमेंट्रीचे पोस्टर शेअर केला होता. पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील युझर्स संतापले होते. 


हेही वाचा:


Leena Manimekalai : 'काली' दिग्दर्शिकेवर भडकले अशोक पंडित; म्हणाले, 'हे करणारी व्यक्ती हिंदू असेल तर...'