Koffee With Karan 7, Gauri Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) त्याचा लोकप्रिय शो कॉफी विथ करणचा 7वा सीझन (Koffee With Karan 7) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, करण हा शो होस्ट करत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले आहे. अनेकदा कलाकार आपल्या मनातील भावना आणि आयुष्यातील रहस्यांचा उलगडा या मंचावरच करतात. यावेळीही असेच काहीसे घडणार आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी आणि इंटिरियर डिझायनर गौरी (Gauri Khan) अनेक खुलासे पाहायला मिळणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या शोमध्ये गौरी खान पहिल्यांदाच तिचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणावर उघडपणे बोलताना दिसणार आहे.


आतापर्यंत शाहरुख किंवा गौरी या दोघांनीही या विषयावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. करण जोहर हा गौरी खानचा चांगला मित्र आहे. या सोबतच भावना पांडे आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर या देखील गौरीच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा सोशल मीडियावर एकत्र पाहायला मिळतात. करण जोहरचे शाहरुख खानसोबत चांगले संबंध आहेत. असेही म्हटले जाते की, करण गौरीला आपली मोठी बहीण मानतो. त्यामुळे आता गौरी त्याच्यासमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करेल, असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत.


मीडियापासून दूर गेली गौरी!


आर्यन ड्रग्स प्रकरणानंतर गौरी खानने स्वतःला मीडियापासून दूर केले होते. मात्र, करणसमोर इतक्या वर्षांनी गौरी या शोमध्ये एकत्र येणार आहे, त्यामुळे साहजिकच तिला काही वैयक्तिक प्रश्न विचारले जाणार, हे नक्की. अशा वेळी तिने शोमध्ये करणशी बोलताना आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणावर चर्चा केली तर अनेक चाहत्यांना त्याची माहिती मिळेल आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबाबत अधिक खुलासा देखील होईल.


आर्यन खानची निर्दोष मुक्तता!


आर्यन खानला गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी क्रुझवर ड्रग्ज नेल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला 28 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. मात्र, आता आर्यनची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, नुकतेच न्यायालयाने त्याचा पासपोर्टही परत करण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा: