Ghoomer:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा घुमर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) देखील सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करुन घुमर (Ghoomer) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.


वीरेंद्र सेहवागनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'काल मी घूमर चित्रपट पाहिला. खूप छान चित्रपट आहे. खूप दिवसांनी क्रिकेटचा चित्रपट बघून खूप आनंद झाला. कारण त्यात क्रिकेट आहेच पण त्यात भावनाही आहेत आणि खेळाडूचा संघर्ष काय असतो? हेही दाखवण्यात आलं आहे. विशेषत: दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूचा संघर्ष काय असतो, हे देखील दखावण्यात आलं आहे. मी स्पिनरला रिस्पेक्ट देत नाही, पण सैयामीने ज्या पद्धतीने चेंडू फिरवला ते आश्चर्यकारक होते. ही भूमिका कठिण होती, पण तिनं इमोशनल केलं. मी प्रशिक्षकाचेही ऐकले नाही, पण अभिषेकचा अभिनय इतका चांगला होता की, तुम्हाला त्याचे ऐकावेच लागेल.'


पुढे वीरेंद्र सेहवाग म्हणाला, '18 ऑगस्टला घुमर हा चित्रपट कुटुंबासोबत नक्कीच बघा. जसं बच्चनजींनी सांगितलं तसं मी पण म्हणतो, आय लव्ह थिस गेम'


वीरेंद्र सेहवागनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं,'घूमर हा चित्रपट पाहून खरोखरच आनंद झाला. क्रिकेट, प्रेरणा आणि भावना या भरभरुन आहेत. अपने आसून लेके जाना थिएटर में. ये हैं मेरा Ghoomer Review'






अभिषेक बच्चननं वीरेंद्र सेहवागचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वीरू पाजी, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तुमचे प्रोत्साहन आमच्यासाठी महत्वाचे होते.'


घूमर हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक आर. काल्की यांनी दिग्दर्शित केलेला आहे. ज्यामध्ये एका हातानं बॉलिंग करणाऱ्या खेळाडूची कथा दाखवण्यात येणार आहे. शिवेंद्र सिंह आणि इनवाका दास  या कलाकारांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Pathan: क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं 'पठाण' पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'टाईमपास..."