मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या चर्चा रंगल्या. मात्र नुकतीच अशी घटना घडली की, विराट आणि अनुष्काचे संबंध सुधारण्याची शक्यता वाढली आहे.




विराटने अनुष्का शर्माला तिच्या वाढदिवसाला अनोख गिफ्ट दिलं. हे गिफ्ट म्हणजे विराटने अनुष्काला इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पुन्हा एकदा फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. 1 मे रोजी अनुष्काचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाला तिला सोशल मीडियावर फॉलो करुन त्याने हा दिवस आणखीच स्पेशल बनवला.



ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चा होती. पण आता विराटने तिला फॉलो केल्यानंतर हेच समजतं की दोघे पुन्हा पॅचअपच्या मूडमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोघे मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र डिनर करताना दिसले होते.