नवी दिल्ली : 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज संध्याकाळी पार्श्वगायक महेश काळे, 'आर्ची' रिंकू राजगुरु यांच्यासह अन्य मराठी-हिंदी कलाकार आणि कलाकृतींचा गौरव होईल.


 
'बाहुबली'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत यांचा सन्मान होईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांना गौरवण्यात येणार आहे. 'सैराट'मधील भूमिकेमुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी 'आर्ची' अर्थात रिंकू राजगुरु, 'कट्यार..' चित्रपटातील गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घालणारे पार्श्वगायक महेश काळे यांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.

 

 

सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबली
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (पीकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साली (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - रिंगण
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)
विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट - हरिष भीमानी (मला लाज वाटते)
विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट) (मराठी)
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म - अमोल देशमुख - औषध (मराठी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट- पायवाट (मराठी)
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट - दारवठा (मराठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) - कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट गीतकार - वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट गायिका - मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद - पीकू आणि तनू वेड्स मनू (विभागून)
सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) - विशाल भारद्वाज (तलवार)
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) - जुही चतुर्वेदी (पीकू)
सर्वोत्कृष्ट नृत्य - रेमो (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन - बाजीराव मस्तानी
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट - बाहुबली