Virat Kohli Anushka Sharma : क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनुष्काने 15 फेब्रुवारी 2024 रोजी अकायला (Akaay Kohli) जन्म दिला आहे. अकायच्या जन्मापासून अनुष्का लंडनमध्ये (UK) आहे. त्यामुळे आता विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) परदेशात स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे.
अनुष्का शर्मा कुठे आहे?
अनुष्का शर्मा गेल्या पाच महिन्यांपासून लंडनमध्ये आहे. विराट कोहली नुकताच भारतात स्पॉट झाला. पण त्याच्यासोबत अनुष्का नव्हती. लेकाच्या जन्मानंतर विराट कोहली पहिल्यांदाच भारतात आला होता. विराट 22 मार्च 2024 रोजी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात होणाऱ्या आयपीएल (IPL 2024) सामन्याचा भाग होणार आहे. विराटला एकट्यालाच भारतात पाहून चाहत्यांनी त्याला अनुष्का कुठे आहे? असा प्रश्न विचारला.
विराट-अनुष्काच्या निर्णयावर चाहत्यांची नाराजी
विराट क्रिकेट सामन्यासाठी भारतात आला आहे. भारतात स्पॉट झालेले त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. क्रिकेट सामन्यानंतर विराट-अनुष्का पूर्णपणे परदेशात स्थायिक होणार, तुमच्याकडे पैसा असेल तर परदेशातच तुम्ही जायला हवं, अनुष्काने तसंही गृहिणी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, आधी पत्नीसाठी देश सोडला आणि आता फ्रेंचायझीसाठी पत्नीला सोडून भारतात आला आहेस, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी विराट-अनुष्काच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
अकायला मिळणार परदेशाचे नागरिकत्व?
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लंडनमध्ये प्रॉपर्टी आहे. अकायचा जन्म लंडनमध्ये झाल्याने त्याला तिथलं नागरिकत्व मिळणार असं म्हटलं जात आहे. पण नागरिकत्व मिळवण्यासाठी फक्त परदेशातला जन्म नसून एका पालकाकडे नागरिकत्व असणं गरजेचं आहे. किंवा पालक अनेक वर्षांपासून परदेशात राहत असतील तरचं मुलाला तिथलं नागरिकत्व मिळू शकतं. अनुष्का शर्माची लेक वामिकाचा (Vamika Kohli) जन्मदेखील लंडनमध्ये झाला होता.
विराट-अनुष्काने अद्याप लंडनमध्ये राहण्याबाबत चाहत्यांना अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. विरुष्का त्यांच्या दोन्ही मुलांसह परदेशात राहणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने चाहते नाराज झाले आहेत. तसेच अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा मनोरंजनसृष्टीपासून दूर जाणार असल्याच्या चर्चादेखील सुरू आहेत. अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या