Anushka-Virat Pics: 'पावर कपल' अशी ओळख असणारे विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. विरुष्काच्या सोशल मीडियावरील फोटोला आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच विराटनं अनुष्कासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
विराटानं शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का ही ऑरेंज कलरच्या वनपीसमध्ये दिसत आहे तर विराट हा ब्लॅक शर्टमध्ये दिसत आहे. विराटनं फोटोच्या कॅप्शनमध्ये दोन हार्ट्सचं इमोजी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्काचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. विरुष्काच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
विरुष्काच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'कोहली भाऊ, जरा हसा नाहीतर लोक म्हणतील तुम्ही इतके गंभीर का आहात?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'रब ने बना दी जोडी' तर "दिल्ली डायरी...गॉड ब्लेस यू..." अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली आहे.
विराट कोहली हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 247 मिलियन फॉलोवर्स आहेत. विराट हा सोशल मीडियावर त्याचे क्रिकेटच्या मॅच दरम्यानचे फोटो तसेच अनुष्का आणि वामिकासोबतचे फोटो शेअर करत असतो.
2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला. अनुष्का आणि विराट एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रातमधून ब्रेक घेतला होता. अनुष्काचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता अनुष्का ही बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्का शर्मा देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. अनुष्काला इन्स्टाग्रामवर 63 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: