The Kerala Story Twitter Review:   'द केरळ स्टोरी' (The Kerala Story)  हा चित्रपट आज (5 मे)  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही लोकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी केली होती. पण आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या चित्रपटाबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे? ते जाणून घेऊयात...


एका नेटकऱ्यानं 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट  पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. या रिव्ह्यूमध्ये त्यानं लिहिलं, "द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा एक भाग होण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला लकी समजतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. मी प्रत्येक भारतीयाला हा चित्रपट पाहण्याची आणि जनजागृती करण्याची विनंती करतो. इतका धाडसी चित्रपट बनवल्याबद्दल विपुल शाह जी आणि सुदिप्तो सेन जी तुमचे आभार."






 'हे केरळचेच नव्हे तर आपल्या समाजाचे काळे सत्य आहे! हा चित्रपट अवश्य पहा.' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे. 






एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले,  'नुकताच 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहिला. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रपोगंडा नाही तर हा सत्य कथेवर आधारित आहे. अनेकांनी हे मान्य केले आहे.'





 अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


The Kerala Story Review : केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी'