Shah Rukh Khan Pathaan Movie Latest Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर आता या सिनेमाने नवा विक्रम रचला आहे. बांगला देश (Bangladesh) स्वतंत्र झाल्यानंतर प्रदर्शित होणारा 'पठाण' हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे.


बांगलादेश फाळणीनंतर प्रदर्शित झालेला पहिला हिंदी सिनेमा शाहरुखचा 'पठाण'


सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. जागतिक पातळीवरील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 1050 कोटींचा गल्ला जमवला आहे. जगभरात हा सिनेमा तुफान चालला. आता शाहरुखचा 'पठाण' बांगलादेश फाळणीनंतर प्रदर्शित झालेला पहिला हिंदी सिनेमा ठरणार आहे. 12 मे 2023 रोजी हा सिनेमा बांगला देशात प्रदर्शित होणार आहे. 


इंटरनॅशनल डिस्ट्रिब्युशनचे उपाध्यक्ष नेल्सन डिसुझा म्हणाले,"सिनेमा ही नेहमीच राष्ट्र, वंश आणि संस्कृती यांच्यात एकीकरण करणारी शक्ती आहे. सिनेमा हे माध्यम सीमा ओलांडते, लोकांमध्ये चेतना जागृत करते आणि एकत्र आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जगभरात अद्वितीय व्यवसाय कमाविणाऱ्या 'पठाण'ला आता बांगलादेशातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळणार आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो". 






नेल्सन डिसुझा पुढे म्हणाले,"पठाण' हा बांगलादेशात 1971 नंतर प्रदर्शित होणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे आणि अधिकाऱ्यांच्या निर्णयाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. शाहरुख खानचे बांगलादेशात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे आता बांगलादेशातही हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालणार आहे". 


व्हायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा 'पठाण'
 
'पठाण' हा व्हायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ज्यामध्ये ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘वॉर’सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचाही समावेश आहे.


'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. या सिनेमातील शाहरुखचा अभिनय, गाणी सर्वकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'पठाण'


'पठाण' या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : पाकिस्तानात कलाकारांकडून 'किंग खान'ला अनोखी भेट; साकारलं हुबेहूब प्रतिमेचं सँड पोर्ट्रेट