Shah Rukh Khan on Virat Kohli : आयपीएल (IPL 2024)  नाइट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) नुकतचं क्रिकेटर विराट कोहलीसोबत (Virat Kohli) भाष्य केलं आहे. शाहरुखने त्याच्या लाडक्या कोहलीचं कौतुक केलं आहे. शाहरुख खानने विराट कोहलीसोबत असलेल्या आपल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. शाहरुख खान म्हणाला,"विराट कोहलीसोबत मी खूप वेळ घालवला आहे. माझं विराटवर प्रेम आहे. मला वाटतं, खरंतर तो आमचा जावईच आहे. इतर खेळाडूंपेक्षा विराट कोहलीला मी चांगलं ओळखतो". 


विराट कोहली आणि अनुष्का शर्माला अनेक दिवसांपासून ओळखतो : शाहरुख खान


शाहरुख खान स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,"विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांना मी अनेक दिवसांपासून ओळखतो. दोघांसोबत मी खूप वेळ घालवला आहे. अनुष्का आणि विराट एकमेकांना डेट करत असल्यापासून मी त्यांना ओळखतोय. विराटसोबत रिलेशनमध्ये असताना अनुष्का माझ्यासोबत चित्रपटाचं शूटिंग करत होती. विराटला मी 'पठाण' (Pathaan) चित्रपटातील शीर्षक गीताचे डान्स स्टेप शिकवले आहेत. रवींद्र जडेजासोबत एका सामन्यादरम्यान तो डान्स करत होता तेदेखील मी पाहिलं आहे". 


शाहरुख पुढे म्हणाला,"विराट डान्स करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला पाहून मलाच वाईट वाटत होतं. पुढील वर्ल्ड कपमध्ये किंवा अन्य सामन्यांमध्ये डान्स करण्याआधी विराटला मी डान्स शिकवावा असं मला वाटतं". 


शाहरुख खाननं सांगितली मन की बात...


शाहरुख खान म्हणाला की, शानदार खेळाडू देशासाठी खेळत आहेत, मी रिुंकू सिंगसाठी उत्सूक आहे, इन्शाअल्लाह त्याला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळावं त्यासह इतर संघांच्या युवा खेळाडूंना देखील संधी मिळावी. अनेक युवा खेळाडू दावेदार आहेत. मात्र, मला वैयक्तिक असं वाटतं रिंकू सिंगला संघात स्थान मिळावी, मला आनंद होईल". 


शाहरुखचा समावेश आज जगातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केला जातो. शाहरुखची एकूण संपत्ती 6300 कोटींच्या आसपास आहे. पण त्याची पहिली कमाई ही फक्त 50 रुपये होती. करीयरच्या सुरुवातीला हा अभिनेता तिकीट विक्रीचा काम करायचा. या कामाचा  मोबदला त्याला फक्त 50 रुपये मिळत असे, पुढे मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केले.अनेक सुपरहिट सिनेमे देऊन सिने जगतात त्याने स्वत:चा अमिट ठसा उमटवला आहे.   


संबंधित बातम्या


Bollywood Actor : आईच्या शेवटच्या दिवसात सोबत राहण्यास तयार नव्हता हा अभिनेता, पहिली कमाई अवघी 50 रुपये आज आहे तब्बल 6300 कोटींचा मालक; ओळखलत का ?