R Madhavan First Look out From Shaitaan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी 'शैतान' (Shaitaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अजयसह आर. माधवन (R Madhavan) आणि ज्योतिका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमातील आर. माधवनचा खतरनाक लूक आता समोर आला आहे. या सिनेमात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.


आर. माधवनचा लूक आऊट! (R Madhavan Look Out)


'शैतान' सिनेमातील आर. माधवनचा लूक आऊट झाला आहे. या लूकमध्ये अभिनेता खूपच भयानक दिसत आहे. निळे डोळे आणि चेहऱ्यावर एक वेगळचं हसू पाहायला मिळत आहे. पोस्ट आऊट झाल्यावर लगेचच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अंगावर शहारे आणणारा अभिनेत्याचा लूक आहे. 






'शैतान'च्या माध्यमातून ज्योतिकाचं कमबॅक


'शैतान' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री ज्योतिका 25 वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. 1997 मध्ये तिचा 'डोली सजा के रखना' (Doli Saja Ke Rakhna) हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून तिने हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पुढे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. 


'शैतान'बद्दल जाणून घ्या... (Shaitaan Movie Details)


'शैतान' या सिनेमात अजय देवगन (Ajay Devgn), आर. माधवन (R. Madhavan) आणि ज्योतिका (Jyotika) मुख्य भूमिकेत आहेत. तसेच ज्योती देशपांडे (Jyoti Deshpande), कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक (Abhishek Pathak) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सस्पेन्स, थ्रिलर आणि नाट्य या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजय देवगन 2024 गाजवणार आहे. शैतान'सह अजयचे 'औरों में कहां दम था','मैदान','सिंघम अगेन','रेड 2' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.


'शैतान' हा सिनेमा 8 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकास बहल यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दृश्यमनंतर अजय देवगन पुन्हा एकदा एक कौटुंबिक गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे पाहावे लागेल.


संंबंधित बातम्या


Ajay Devgan Shaitan Movie : 'दृश्यम'नंतर अजय देवगनची पुन्हा एक कौटुंबिक गोष्ट, 'शैतान' चित्रपटाचं नवं पोस्टर, लवकरच येणार सिनेमागृहात