Anushka Sharma And Virat Kohli: अभिनेत्री  अनुष्का शर्मा आणि  क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli)  हे सध्या बंगळुरूमध्ये दिवाळी सेलिब्रेट करत आहेत. बंगळुरूमधील विरुष्काचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अनुष्काचे बेबी बंप दिसत आहे, असं नेटकरी म्हणत होते. आता विरुष्काचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता विरुष्का गुडन्यूज कधी देणार? असा प्रश्न नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडत आहे.


विरुष्काचा व्हिडीओ व्हायरल (Anushka And Virat Video)


अनुष्का आणि विराट हे  बंगळुरूमधील त्यांच्या हॉटेलमध्ये दिवाळी सेलिब्रेट करत आहेत. नुकताच अनुष्का आणि विराट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विरुष्का हे ट्रेडिशनल आऊफिटमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का ही पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अनुष्का ही ओढणीनं बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


 विरुष्काच्या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मला वाटते की ते 2023 विश्वचषक जिंकल्यानंतर ते गुडन्यूज देतील" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "अनुष्का बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे"


पाहा व्हिडीओ






अनुष्का आणि विराटचा खास लूक


बंगळुरूमधील दिवळी सेलिब्रेशनसाठी अनुष्का आणि विराट यांनी खास लूक केला होता. अनुष्कानं पिंक कलरचा ड्रेस, पर्पल कलरची ओढणी आणि मोकळे केस असा लूक केला होता. तर विराटनं हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. 


अनुष्का आणि विराट या दोघांना काही दिवसांपूर्वी मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, पण तेव्हा दोघांनीही पापाराझींना फोटो न काढण्याची विनंती केली होती.  आम्ही याबाबत लवकरच घोषणा करणार आहोत, असंही त्यांनी त्यावेळी सांगितले होतं. याच कारणामुळे अनुष्काच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पण याबाबत विराट आणि अनुष्कानं अजुन कोणतीही माहिती दिली नाही.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Video: अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? विरुष्काच्या व्हिडीओनं वेधलं अनेकांचे लक्ष!