The Kashmir Files : बहुचर्चित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.


630 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर दिवस-रात्र  'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचे शो सुरू आहेत. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 3 कोटी 55 लाखांची कमाई केली आहे. विकेण्डला हा सिनेमा आणखी कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.





हरियाणा सरकारने 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा करमुक्त केला आहे. हा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकदेखील भावूक झाले आहेत. प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याचे व्हिडीओ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.





काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार अशी तगडी स्टारकास्ट आहे. 


संबंधित बातम्या


Runway 34 Motion Poster : अजय देवगण आणि बिग बींच्या 'रनवे 34' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज, ईदच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित


Ashneer Grover : ‘ये सब दोगलापन है!’ म्हणणाऱ्या अश्नीर ग्रोव्हरच्या घरात 10 कोटींचं डायनिंग टेबल! लक्झरी लाईफ पाहिलीत?


Black Panther Director Arrested : गलतीसे मिस्टेक! बँक दरोड्याच्या आरोपाखाली ‘ब्लॅक पँथर’च्या दिग्दर्शकाला आधी अटक, मग सुटकाही! नेमकं काय झालं?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha