Vikrant Massey  :  विक्रांत मेस्सी (Vikrant Massey ) हा सध्या 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) सिनेमामुळे बराच चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने विक्रांत बऱ्याच मुद्द्यांवर त्याची वैयक्तिक मतं मांडतोय. याच सिनेमाच्या निमित्ताने तो देत असलेल्या मुलाखतींवरुन तो आता भाजपच्या बाजून बोलत असल्याचं म्हटलं जातंय. या सगळ्यावर विक्रांतने नुकतच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.  त्याचप्रमाणे भारतातले मुसलमान धोक्यात नाहीयेत, सगळं चांगलं सुरु आहे, असंही मत विक्रांतने व्यक्त केलं आहे. 


गोध्रा घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या भीषण घटनेवर भाष्य करणारा विक्रांत मेस्सीचा द साबरमती रिपोर्ट हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. लोकसभेच्या काळातच हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण त्याच वेळी या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. त्यानंतर आता येत्या 15 नोव्हेंबर रोजी सिनेमाचा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'ज्या गोष्टी मला चुकीच्या वाटायच्या त्या मला...'


विक्रांतने शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी मला लोकांसमोर आणायाचीये. लोकं बदलतात, मी जे 10 वर्षांपूर्वी तसा मी आता नाहीये. अशा अनेक गोष्टींना बदलण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे. माझ्या कामामुळे मी दुनियाभरात फिरतो. मी लोकांना भेटतो. स्वत:चे डोळे आणि कानही आहे. ज्या गोष्टी मला चुकीच्या वाटायच्या त्या मला आता वाटत नाहीत. कारण आता मला असं वाटतंय की, गोष्टी तितक्याही चुकीच्या नाहीयेत जितक्या मला वाटल्या होत्या. त्यामुळे मी आज म्हणतोय की, होय मी बदललो आहे.


येणाऱ्या धमक्यांविषयी विक्रांतने म्हटलं की, धमक्या म्हणजे मला काही जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या नाहीत. कुठेतरी आमचा सिनेमा हा हिंदूंसाठी आहे, असं म्हटलं जातंय. तेव्हा मला म्हणतात की, तुम्ही आमच्या समाजाला चुकीच्या पद्धतीने दाखवताय आम्ही तुम्हाला पाहून घेऊ. मी तुम्हाला एवढच म्हणेन की तुम्ही येऊन सिनेमा पाहू शकता. काही महिन्यांपूर्वी माझा फोन नंबरही लिक झाला आहे. त्यामुळे हा लोकांना पूर्वग्रह झाला आहे की, आम्ही एका ठरावीक समाजाला टार्गेट करतोय आणि कोणत्यातरी एका समाजाला बदनाम करतोय. ही सगळी मतं लोकांनी टीझर आणि ट्रेलर पाहूनच केली आहेत.


विक्रांत त्याच्य सोशल मीडियवरील काही वादग्रस्त पोस्टमुळे कायमच चर्चेत असतो. त्याचप्रमाणे तो सेक्युलर असल्याचंही तो त्याच्या मुलखतींमध्ये म्हणतोय. त्याने शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीमध्येही हा उल्लेख केला आहे. पण आपण धार्मिकपेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या एक असणं गरजेचं आहे, असंही विक्रांत म्हणाला आहे.  






ही बातमी वाचा : 


Aamir Khan : घटस्फोटानंतरही एक्स बायकोसोबत काम, आमिर खानने अखेर मौन सोडलं; म्हणाला...