Aamir Khan On Divorce: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आमिर (Amir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) 2021 मध्ये वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. लग्नाच्या 16 वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण घटस्फोटानंतर आमिर आणि किरणने त्यांच्या कामावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. इतकच नव्हे तर ते दोघेही चांगले मित्र म्हणून राहिले.
किरणने तिचा मुलगा आझादसोबत आयरा खानच्या लग्नाला हजेरी लावली होती. तसेच आमिरने किरणला लपता लेडीज या चित्रपटात खूप मदत केली होती. पण घटस्फोटानंतरही किरणसोबतच्या इतक्या जवळच्या संबंधांवर आमिरने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
आमिर खानने काय म्हटलं?
आमिर खानने एका मुलाखतीमध्ये या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटलं की, 'घटस्फोटामुळे ते नवरा - बायको या विचारसरणीपासून आणि जबाबदाऱ्यांपासून दूर गेले आहेत. पण त्यांच्या कामातील पार्टनरशिपवर याचा काहीही परिणाम झाला नाही. घटस्फोटाचा आमच्या नातेसंबंधावर कोणताही परिणाम झाला नाही.'
आमचा एकमेकांवर विश्वास कायम
हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना आमिरने म्हटलं की, आम्ही नवरा बायको म्हणून वेगळे झाले आहोत, माणूस म्हणून नाही. म्हणूनच यामुळे काही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. घटस्फोट हा वेगळा विषय आहे. आम्ही माणूस म्हणून एकमेकांशी चांगलं वागतोय. आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आम्ही इतकं चांगलं काम करतोय, असं मला वाटतंय.
किरणनेही यावर बोलताना म्हटलं की, जेव्हा त्यांच्यात मतभेद होतात तेव्हा ते बसून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो. मला वाटते की, आमची पार्टनरशिप इतके दिवस टिकण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आमिर आणि किरण यांचे 2005 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आझाद देखील आहे. लग्नाच्या 16 वर्षानंतर आमिर आणि किरणने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली होती.