vikram gokhale: पुण्याच्या (Pune) दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे, ते डोळे उघडत आहेत तसेच त्यांच्या हात आणि पायांची देखील हलचाल होत आहे. पुढील 48 तासांत  व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया ही स्थिर आहे.' असं शिरीष याडगीकर यांनी सांगितलं. 


विक्रम गोखले यांचे स्नेही राजेश दामले यांनी देखील विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत सांगितलं होतं. 'कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खूप  कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण डॉक्टरांचे सध्या प्रयत्न सुरु आहेत.  जसे पुढचे अपडेट्स येतील तसे सर्वांना कळवले जाईल. त्यांची मेडिकल कंडिशन ही क्रिटीकल आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत डॉक्टर माहिती देत नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा.', असं त्यांनी सांगितलं होतं. 


वृषाली यांनी सांगितलं की, 'विक्रम गोखले यांच्यावर 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.'



 30 ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला. विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या सिंहासन या कार्यक्रमाचे विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केले होते. 


काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. तसेच विक्रम गोखले यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 


अग्निपध, अकेला, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Vikram Gokhale:  "अफवांवर विश्वास ठेवू नका, विक्रम गोखलेंवर उपचार सुरु"; स्नेही राजेश दामलेंची माहिती