Amol Kolhe On Shivputra Sambhaji : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हेंनी आजवर अनेक ऐतिहासिक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता अमोल कोल्हेंनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्याच्या माध्यमातून ते आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


डॉ. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते डायलॉग म्हणताना दिसत आहेत,"हा शिवपुत्र संभाजी. या सह्याद्री पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल. इथल्या पाण्याच्या थेंबथेंबात अन् मातीच्या कणाकणांत मिसळलेला सळसळत्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनात धगधगता ठेवा". 'शिवपुत्र संभाजी' या नाटकातील हा डायलॉग आहे. 


'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे प्रयोग संभाजीनगरमध्ये होणार आहेत. व्हिडीओ शेअर करत कोल्हेंनी लिहिलं आहे,"पुन्हा तोच झंझावत... 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य... 23 ते 28 डिसेंबर...संभाजीनगर...तिकीट विक्री 1 डिसेंबरपासून". 






जय शिवराय..पुन्हा नव्या जोमाने, नव्या उमेदीने, नव्या उत्साहात शिवपुत्र संभाजी या थरारक महानाट्याचा प्रयोग पार पडणार आहे...खूप खूप शुभेच्छा, संभाजी नगराचं नामकरण झाल्यानंतर तुम्ही हे नाटक घेऊन येत आहात...चांगला योगायोग, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी डॉ. अमोल कोल्हेंच्या व्हिडीओवर केल्या आहेत. 


अमोल कोल्हेंनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो किंवा संभाजी महाराजांची भूमिका, त्यांच्या सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 'राजा शिवछत्रपती', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'स्वराज्यजननी जिजामाता' या ऐतिहासिक मालिकांमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी काम केलं आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


संबंधित बातम्या


Shivpratap Garudzep : जय भवानी.. जय शिवराय !! 'शिवप्रताप गरुडझेप'चा थरार आता घरबसल्या अनुभवा