Vijay Thalapathy Film Broke Sholay Record : विजय थलापती (Vijay Thalapathy) स्टारर 'घिल्ली' (Ghilli) हा चित्रपट 2004 मध्ये पहिल्यांदा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता 20 वर्षांनी पुन्हा एकदा हा सुपरहिट चित्रपट सिनेमागृहात रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. री-रिलीज कलेक्शनमध्ये चित्रपटाने 'शोले' आणि 'टायटॅनिक' सारख्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 


'घिल्ली' हा 2003 मध्ये आलेल्या 'ओक्काडु' या तेलुगू हिट चित्रपटाचा रीमेक आहे. 20 एप्रिल 2024 रोजी 'घिल्ली' हा चित्रपट रिलीज होऊन 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता रिलीजच्या 20 वर्षानंतर तामिळनाडू आणि इतर काही ठिकाणी पुन्हा एकदा सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. री-रिलीजला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'घिल्ली'ने री-रिलीजच्या 9 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


'शोले' अन् 'टायटॅनिक'चा रेकॉर्ड मोडला


'घिल्ली'ने री-रिलीज कलेक्शनमध्ये 'शोले' आणि 'टायटॅनिक' या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याआधी 2013 मध्ये 'शोले' हा सिनेमा दुसऱ्यांदा सिनेमागृहात रिलीज झाला होता तेव्हा चित्रपटाने 13 कोटींची कमाई केली होती. री-रिलीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'छोले' ठरला होता. तसेच 'टायटॅनिक' चित्रपटाने री-रिलीजमध्ये 18.5 कोटींची कमाई केली होती. आता 'घिल्ली'ने या दोन्ही चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.


वर्षातला सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट


'घिल्ली' या चित्रपटाने री-रिलीजमध्ये 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'घिल्ली' हा 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चौथा तामिळ चित्रपट ठरला आहे. याआधी अयलान, कॅप्टन मिलर आणि लाल सलाम हे तामिळ चित्रपट टॉपवर होते. री-रिलीजमध्ये 'घिल्ली' या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. 


'घिल्ली'ची स्टारकास्ट (Ghilli Movie Starcast)


'घिल्ली' या चित्रपटात विजय थलापतीसह तृषा कृष्णन मुख्य भूमिकेत होते. तसेच प्रकाश राज, आशीष विद्यार्थी, मयिलसामी, जानकी सबेश, नैन्सी जेनिफर, नागेंद्र प्रसाद, पोन्नम्बलम आणि पांडु या चित्रपटाचा भाग आहेत. घिल्ली हा 2004 चा भारतीय तमिळ-भाषेतील स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात एक कबड्डीपटू मदुराईला एका सामन्यात सहभागी होण्यासाठी जातो, पण त्याऐवजी एका महिलेला वेड लागलेल्या टोळीच्या नेत्यापासून वाचवतो. साउंडट्रॅक अल्बम आणि स्कोर विद्यासागर यांनी संगीतबद्ध केला होता, तर छायांकन गोपीनाथ यांनी हाताळले होते आणि संपादन व्ही.टी. विजयन आणि बी. लेनिन यांनी केले होते. या चित्रपटाचे संवाद भरथन यांनी लिहिले आहेत.



संबंधित बातम्या


Thalapathy Vijay : साऊथ स्टार थलापती विजयची राजकारणात एन्ट्री, पक्षाचं नाव काय ठेवलं?